एक्स्प्लोर
CM Poster : कोण कोण होणार मुख्यमंत्री?
राज्यात सर्वाधिक महत्वाचं राजकीय पद म्हणजे मुख्यमंत्री पद.. प्रत्येक नेत्याला मुख्यमंत्री होण्याची होण्याची इच्छा असते.
CM Poster
1/12

अनेकजण जाहीर कार्यक्रमातून तर कधी एखाद्या मुलाखतीतून किंवा ऑफ दी रेकॉर्ड मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्याचं सांगतात.. तसं तर प्रत्येक नेत्यांच्या कार्यकर्त्यांना आपल्या साहेबाने मुख्यमंत्री व्हावं असं वाटत असतं. मुख्यमंत्री होण्याची इच्छा किंवा महत्वाकांक्षा बाळगण्यात तसं काहीच गैर नसतं.
2/12

राज्यात मोदी लाटेनंतर 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर त्यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी एबीपी माझाच्या कट्ट्यावर ते स्वतः मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्याचं सांगितलं होतं.
3/12

खासदार सुप्रिया सुळे यांनी असे पोस्टर किंवा होर्डिंग लावल्याबद्धल तीव्र नाराजी व्यक्त करत चौकशी करण्याची मागणी केली होती. कुणीही येतं आणि पोस्टर लावून जातं याबद्धल त्यांनी नापसंती व्यक्त केली होती.
4/12

पुण्याच्या आणि बीडच्या कार्यक्रमांमध्ये लोकांच्या मनातील मुख्यमंत्री असा शब्दप्रयोग पंकजा मुंडे यांच्या बद्दल झाला आणि तिथून लोकांच्या मनातील मुख्यमंत्री असं विरोध त्यांच्या मागे लावलं गेलं
5/12

मधल्या काळात पुण्यातील काही उत्साही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सुप्रिया सुळे या भावी मुख्यमंत्री असल्याचं आणि त्यांना शुभेच्छा देणारे होर्डिंग लावले होते.
6/12

राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही भावी मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा देणारे होर्डिंग लावले होते.
7/12

महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे हे ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत असं मनसैनिकांना वाटतं. त्यासाठी अनेकदा होर्डिंग लावून भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला जातो.
8/12

महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री.. हिंदूजननायक राजसाहेब ठाकरे असा उल्लेख मनसैनिक पोस्टर लावताना करतात.
9/12

आता माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांना भावी मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा देणारी पोस्टर्स आणि होर्डिंग त्यांची सासुरवाडी असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील तेर या गावात लागली आहेत.
10/12

या होर्डिंगला अर्थातच सध्या सुरु असलेल्या राजकारणाचा संदर्भ आहे. या पोस्टरवर अजून अजित पवार यांची प्रतिक्रिया आलेली नाही
11/12

तिकडे तेरमध्ये अजित पवारांना भावी मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा देणारे फोटो लागलेले असतानाच सध्याचे उपमुख्यमंत्री आणि या अगोदर राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी
12/12

भावी मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा देणारे होर्डिंग त्यांच्या नागपुरातील कार्यकर्त्यांनी लावलेत. त्यालाही अर्थातच सध्या सुरु असलेल्या मुख्यमंत्री बदलाच्या वावड्यांचा संदर्भ आहे..
Published at : 25 Apr 2023 08:12 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























