एक्स्प्लोर
संकल्पाला कष्टाची जोड देवून यशाला गवसणी घाला; अमित शाहांचा विद्यार्थ्यांसाठी संदेश
एखादी गोष्ट सलग 21 दिवस केल्यास त्याची सवय लागते. हीच गोष्ट 90 दिवस केल्यास त्याची शैली बनते, असा संदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विद्यार्थ्यांना दिला.
Amit Shah in Kolhapur
1/10

अमित शाह यांनी कोल्हापूर दौऱ्यात शिवाजी महाराज आणि दसरा चौकात राजर्षी शाहूंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
2/10

अमित शाह यांनी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी महोत्सवाल सपत्नीक हजेरी लावली.
3/10

संकल्पाला कष्टाची जोड देवून यशाला गवसणी घाला, असा संदेश विद्यार्थ्यांना केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी यावेळी बोलताना दिला.
4/10

विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच जीवनाचे लक्ष निर्धारित करुन हे लक्ष्य साध्य करण्यासाठी संकल्प करावेत, असा सल्ला त्यांनी दिला.
5/10

एखादी गोष्ट सलग 21 दिवस केल्यास त्याची सवय लागते. हीच गोष्ट 90 दिवस केल्यास त्याची शैली बनते, असेही ते म्हणाले.
6/10

यावर्षी देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असून देशाने सर्व क्षेत्रात क्रांती केल्याचे ते म्हणाले.
7/10

पीएम नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देश सर्व क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असल्याचे ते म्हणाले.
8/10

पुढील 25 वर्षात देश जगात सर्व क्षेत्रात अव्वल असेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी यावेळी व्यक्त केला.
9/10

न्यू एज्युकेशन सोसायटी समाजाप्रती चांगले काम करीत असून माझ्या पत्नीचे शिक्षण या संस्थेत झाले याचा आपणास अभिमान वाटतो, असेही त्यांनी सांगितले.
10/10

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पत्नी सोनल शाह यांनी मनोगत व्यक्त केले. आपण ज्या शाळेत शिकलो, घडलो त्या शाळेच्या समारंभास आपणास उपस्थित राहता आले हा माझ्यासाठी गौरवाचा क्षण आहे. यावेळी त्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.
Published at : 20 Feb 2023 12:07 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर























