एक्स्प्लोर
Manoj Bajpayee In Kolhapur : देवी अंबाबाईचा प्रसाद म्हणून मिळालेला वृक्ष तुमच्या अनेक पिढ्यांना लाभदायक ठरेल : मनोज वाजपेयी
Manoj Bajpayee In Kolhapur : देवी अंबाबाईचा प्रसाद म्हणून मिळालेला वृक्ष तुमच्या अनेक पिढ्यांना लाभदायक ठरेल, असे मत मनोज वाजपेयी यांनी व्यक्त केले. यावेळी अभिनेते सयाजी शिंदे उपस्थित होते.
Manoj Bajpayee In Kolhapur
1/11

अभिनेते मनोज वाजपेयी यांनी कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात शुक्रवारी सांयकाळी वृक्षप्रसाद योजनेच्या लोकार्पण सोहळ्याला हजेरी लावली.
2/11

कोल्हापूर आणि सह्याद्री देवराई यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री महालक्ष्मी मंदिरात हा कार्यक्रम पार पडला.
3/11

यावेळी त्यांच्यासोबत अभिनेते सयाजी शिंदेही उपस्थित होते.
4/11

देवी अंबाबाईचा प्रसाद म्हणून मिळालेला वृक्ष तुमच्या अनेक पिढ्यांना लाभदायक ठरेल, असे मत मनोज वाजपेयी यांनी व्यक्त केले.
5/11

सह्याद्री वनराई संस्था, देवस्थान समितीतर्फे अंबाबाई मंदिरात अभिषेक करण्यासाठी येणाऱ्या भाविकांना वृक्ष प्रसाद वाटप योजनेच्या आरंभप्रसंगी ते बोलत होते.
6/11

सह्याद्री देवराई सामाजिक संस्था, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आणि सामाजिक वनीकरण विभागातर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला.
7/11

अंबाबाई मंदिरात भाविकांना म्हाळुंग, पारिजातक, बेल जास्वंदी, अर्जुन आदी जातीची फळफुलांची रोपे देण्यात येणार आहेत.
8/11

‘वृक्ष प्रसाद’ ही मोहीम नव्हे, हा एक विचार आहे आणि हा विचार कोल्हापुरातूनच सुरू झाला. ज्यांची देव आणि आई-वडिलांवर श्रद्धा आहे, त्यांनी हा प्रसाद न्यायचा आहे. झाड कधी तुम्हाला फसवत नसल्याचे सयाजी शिंदे म्हणाले.
9/11

यापुढे राज्यभर ही योजना राबवण्यात येणार आहे.
10/11

भाविकांना मिळालेले झाड त्यांनी कुठे लावले आणि त्याचे संगोपन केले, याचे सेल्फी पाठवण्याचेही आवाहन संस्थेने केले आहे.
11/11

मनोज वाजपेयी यांनी अंबाबाई मंदिरात ध्यानही केलं
Published at : 03 Dec 2022 06:55 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























