एक्स्प्लोर
Andhra Pradesh Rains : आंध्रपदेशमध्ये मुसळधार पाऊस; तिन्ही दलांच्या मदतीनं थरारक बचावकार्य!
Feature_Photo_4
1/10

आंध्र प्रदेशात शुक्रवारी रायलसीमाच्या तीन जिल्ह्यांमध्ये आणि एका दक्षिण किनाऱ्यावरील जिल्ह्यांमध्ये 20 सेंटीमीटरपर्यंत कोसळलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. (Photo Tweeted By @AnantapurPolice)
2/10

मुसळधार पावसानं आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. (Photo Tweeted By @AnantapurPolice)
3/10

कडप्पा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 12 जण बेपत्ता झाले आहेत. (Photo Tweeted By @AnantapurPolice)
4/10

वायुसेना, एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या मदतीनं पुराच्या पाण्यात अडकलेल्या अनेकांना वाचवण्यात आलं आहे. (Photo Tweeted By @AnantapurPolice)
5/10

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. (Photo Tweeted By @AnantapurPolice)
6/10

तसेच आंध्र प्रदेशातील पूरस्थितीचा आढावाही घेऊन सर्वोतोपरी मदत देण्याचं आश्वासनही दिलं. (Photo Tweeted By @AnantapurPolice)
7/10

मुख्यमंत्री कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी आज पूरग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत. (Photo Tweeted By @AnantapurPolice)
8/10

मुसळधार पावसानं नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे अनेक गावं पुरानं वेढली गेली आहेत. (Photo Tweeted By @AnantapurPolice)
9/10

रस्त्यांना नद्यांचं रुप आलं आहे. काही ठिकाणी तर रस्तेही वाहून गेले आहेत. पूर्ण शहरात पाणीच पाणी झालंय. (Photo Tweeted By @AnantapurPolice)
10/10

वीजपुरवठाही बंद करण्यात आला आहे. अनेक रस्ते बंद झाले आहेत. तिरुमाला डोंगरांवरुन वाहणाऱ्या पाण्याचंही रौद्ररुप पाहायला मिळतंय. तिरुपती-हैदराबाद मार्गावर वाहतुकीसाठी अडथळे येऊ लागले आहेत. (Photo Tweeted By @AnantapurPolice)
Published at : 20 Nov 2021 02:17 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई






















