एक्स्प्लोर

जुलै महिन्यात पावसाचा हाहाकार, देशभरातील निवडक शहरात पाणी तुंबल्याने चक्काजाम!

या महिनाभरात म्हणजे जुलै महिन्यात पावसाने देशभरात, आसोतूहिमाचल पर्जन्याची मुक्तहस्ते उधळण केलीय. या पावसाने सामान्य जनजीवन विस्कळीत तर झालंच पण नगर नियोजनातील त्रुटीही चव्हाट्यावर आणल्या.

Waterlogged India

1/18
New Delhi: दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांना दिल्लीच्या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी ट्रॅक्टरची मदत घ्यावी लागली. हा परिसर राजघाटाचा आहे. तर तारीख आहे 18 जुलै 2023. राजधानी दिल्लीमध्ये जुलै महिन्यात किती मुसळधार पाऊस झाला आणि जनजीवन कसं विस्कळीत झालं असेल याचा अंदाज येण्यासाठी हा फोटो पुरेसा ठरावा (PTI Photo)

2/18
Palghar: हा फोटो 20 जुलैचा.. मुंबईजवळच्या पालघरचा.. पालघरच्या नालासोपारा परिसरातील ही भाजी मंडई..  नेहमीच्या पावसाळ्यात जलमय होते की काय असं वाटू लागलंय. या परिसरातील बेबंद बांधकामांमुळे अनेक नैसर्गिक जलमार्गाला बाधा पोहोचली असल्याचं या क्षेत्रातील जाणकार सांगतात. नालासोपारा, पालघरमधील काही रस्ते तर चक्क महिनाभर पाण्यात असतात, असं तिथले रहिवासी सांगतात (PTI Photo)

3/18
Jalandhar: पंजाबमधील जालंधर.. जालंधर या शहराच्या नावाचा प्राचीन अर्थ पाण्यात वसलेलं शहर असाच आहे. जुलै महिन्यातील पावसाने शहराच्या नावाचा प्राचीन अर्थ सार्थ केलाय.. सतलज आणि बियास नदीच्या खोऱ्यात वसलेल्या जालंधरला जुलै महिन्यातील पावसाने पाण्याने पूर्णपणे वेढून टाकलं. हा फोटो वीस जुलै रोजीचा आहे. मुसळधार पावसाने शहरातील मार्केटचा परिसर जलमय झाला. सर्वसामान्यांना कमरेइतक्या पाण्यातून वाट काढत दैनंदिन कामे उरकावी लागली. (PTI Photo)

4/18
Jalandhar: पालघरच्या भाजीमंडईची पुन्हा आठवण यावी असाच हा फोटो, पण ही स्थितीही जालंधरच्या भाजी मार्केटची आहे. भाज्यांनी मार्केट सज्ज आहे, या कमरेएवढ्या पाण्यातून वाट काढत ग्राहकांनी खरेदीसाठी कसं यावं हा प्रश्न या भाजीविक्रेत्यांनाही पडला असावा. हा फोटो 22 जुलै 2023 चा आहे. (PTI Photo)

5/18
Jammu: पावसाने काही निवडक राज्ये किंवा शहरे सोडली तर आसेतूहिमाचल सर्वांना तडाखा दिला. 22 जुलैचा हा फोटो जम्मूचा आहे. जम्मू परिसरात परगवालमध्ये चिनाब नदीजवळ पाणी तुंबल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला. दैनंदिन कामकाजासाठी जम्मूकरांना अशा पाण्यातून वाट काढावी लागली. (PTI Photo)

6/18
Amritsar: हा फोटो पंजाबमधील अमृतसरचा..    पाणी तुंबल्याने जलमय रस्ते किंवा परिसर सर्वसामान्य लोकांना अडचणीचा ठरत असला तरी या मुलांनी मात्र त्यात खेळायचा, डुंबायचा आनंद लुटला. ही अमृतसरमधील शनिवार 22 जुलैची परिस्थिती (PTI Photo)

7/18
Amritsar: अमृतसरमधीलच एका शाळेबाहेरचा फोटो.. मराठीतील सांग सांग भोलानाथ गाण्याची आठवण करुन देणारा.. शाळेबाहेर तळं साचल्यावर शाळा तर सोडून द्यावीच लागली, शिवाय शाळा सुटल्यावर पाण्यात खेळायचीही सोय झाली, पण गुडघाभर पाण्यातून वाट काढताना अनेक विद्यार्थींनीची तारांबळ उडाली, फोटो २२ जुलै (PTI Photo)

8/18
Jaipur: हा फोटो राजस्थानची राजधानी जयपूरमधला. जयपूरमधील जेएलएन मार्गावर 26 जुलै रोजी टिपलेला. पावसामुळे या मार्गाची आणि त्यातून वाट काढताना फोटोतील महिलेची स्थिती वेगळी सांगायला नको.. (PTI Photo)

9/18
Thane: हा फोटो ठाण्यातील, म्हणजे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच शहरात 27 जुलै रोजी टिपलेला हा फोटो.. ठाण्यातील वंदना सिनेमा परिसरातील पाणी साचलेल्या रस्त्यातून वाट काढणारी कार.. (PTI Photo)

10/18
Gurugram: हा फोटो दिल्ली-गुरुग्राम महामार्गावरील तुंबलेल्या ट्राफिकचा.. पाणी साचल्यामुळे या महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. महामार्ग तुंबलेला तर सर्विस रोड पाण्याने भरलेला.. वाहनचालकांनी वाट काढायची तरी कशी.. फोटो शुक्रवार 28 जुलैचा..  (PTI Photo)

11/18
Jaipur: जयपूरमधील सिकर रोडची ही शनिवार 29 जुलैची स्थिती.. जलमय झालेल्या रस्त्याची दूरवस्था या ड्रोनफोटोमधून नेमकी टिपली गेलीय.  (PTI Photo)

12/18
Gorakhpur: उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील एका जलमय रस्त्याचा हा फोटो आहे, शनिवार 29 जुलै रोजी काढलेला.. गोरखपूर हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानंद याचा मतदारसंघ.. पावसाने उडवलेली दाणादाण लक्षात येण्यासाठी हा फोटो पुरेसा ठरावा.. (PTI Photo)

13/18
Gurugram:गुरुग्राममधील फळमंडई.. गुरुग्राम हरियाणामधील या सर्वाधिक लोकसंख्येचं आणि राजधानी दिल्लीला लागून असलेलं शहर.. आधी त्याला गुरगांव म्हटलं जाई. पण अलीकडेच त्याचं नामकरण गुरुग्राम झालं, पण नाव बदललं तरी शहरातील नागरी सुविधा बदलल्या नाहीतच.. याची साक्ष पटवणारा, शनिवारी 29 जुलै रोजी काढलेला हा फोटो. फळ आणि भाजी मंडईत विक्री करायचा माल तर आलेला आहे, पण गुडघ्यापेक्षाही जास्त पाण्यात  सर्व मंडई असल्यामुळे ग्राहक येणार तरी कसे,यामुळेच आलेला माल विक्रीसाठी मांडायची हिंमत या फळविक्रेत्याची अजून केलेली नसावी  (PTI Photo)

14/18
Gurugram: हा फोटोही गुरुग्राममधीलच. दिल्ली गुरुग्राम एक्स्प्रेसवेच्या सर्विस रोडचा शनिवारी 29 जुलै रोजी टिपलेला. फक्त भाजी मंडईच नाही तर रस्त्याची अवस्थाही पाणी तुंबल्यामुळे अशी झालेली आहे. बोनेटभर पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांची अवस्था यात नेमकी टिपलेली आहे. दिल्ली-गुरुग्राम एक्स्प्रेस वे मुळे या परिसरात सुबत्ता आली तरी जीवनमान काही उंचावलेलं नाही, याची खात्री पटावी असा हा फोटो (PTI Photo)

15/18
New Delhi: राजधानी नवी दिल्लीचा हा फोटो. हा फोटो जसा जुन्हा म्हणजे 14 जुलै रोजीचा आहे. यमुना नदीला आलेल्या पुरामुळे मोठा परिसर जलमय झाला. एनडीआरएफला मदत आणि बचाव कार्यासाठी चक्क होड्या वापराव्या लागल्या. राजधानी दिल्लीतील एक महत्वाचं आकर्षण आणि उज्ज्वल इतिहासाचा साक्षीदार असलेल्या लाल किल्ला परिसरातील हा फोटो आहे. दिल्लीतल्या या महापुराने तब्बल 45 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडल्याचं हवामान विभाग आणि प्रशासनाकडून सांगण्यात आलं.  (PTI Photo/Manvender Vashist Lav)

16/18
New Delhi: ऐतिहासिक लाल किल्ल्यासमोरच्या रस्त्याचा हा आणखी एक फोटो.. अर्थातच लाल किल्ला परिसराला यमुनेनं वेढल्यानंतरचा म्हणजेच 14 जुलै रोजीचा.. अतिवृष्टीमुळे तसंच ढिसाळ नागरी नियोजनामुळे यापूर्वी कधीही झाली नसेल अशी दिल्लीची अवस्था आजच्या पिढीला पाहायला मिळाली असेल.  (PTI Photo)

17/18
Patna: हा फोटो बिहारची राजधानी पाटण्याचा.. फोटोत स्पष्ट दिसत असल्यामुळे हा फोटो बिहारच्या विधीमंडळ भवनाचा आहे, हे वेगळं सांगायला नको.. अतिशय सुरक्षित तसंच नेमकं नियोजन असलेल्या विधीमंडळ परिसराची पावसाने केलेली अवस्था समजावी म्हणून हा फोटो. हा फोटो ही 14 जुलै रोजीचा आहे. या महिन्याभरात देशभरात सर्वदूर पावसाने हजेरी लावलीय. (PTI Photo)

18/18
Guwahati: आसामची राजधानी गुवाहाटीमधील हा फोटो.. पाण्याने तुडुंब भरलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 27 चा 14 जुलै रोजी टिपलेला. गुवाहाटीजवळच्या जोरभाट परिसरातील. एका राष्ट्रीय महामार्गाची ही अवस्था असेल तर बाकी शहराबद्धल बोलायलाच नको. महामार्गावरही या मोठ्या ट्रकची सर्व चाके पाण्यात आहेत, तर लहान वाहनांनी या रस्त्यावरुन जायलाच नको  (PTI Photo)

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नोंदणी झाली मात्र खरेदी नाही? धाराशिवमध्ये 27 हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी, शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर चकरा

वाहनधारकांना दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य, वाहतूक पोलिसांना आदेश

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray: मोठी बातमी: 'सामना'च्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
देवाभाऊ, अभिनंदन! भाजपवर आग ओकणाऱ्या 'सामना'तून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
Ind vs Aus 5th Test : रोहित शर्माला वगळण्यात आले की स्वतः विश्रांती घेतली? जसप्रीत बुमराह म्हणाला, आमचा कर्णधार स्वार्थ नाही...
रोहित शर्माला वगळण्यात आले की स्वतः विश्रांती घेतली? जसप्रीत बुमराह म्हणाला, आमचा कर्णधार स्वार्थ नाही...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7 AM : 03 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सWalmik Karad : SIT कडून सरपंच हत्येचा तपास, बसवराज यांनी वाल्मिक कराडची पावने दोन तास केली चौकशीABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 03 जानेवारी 2024 : ABP MajhaTop 100 Headlines : सकाळच्या महत्त्वाच्या शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 03 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नोंदणी झाली मात्र खरेदी नाही? धाराशिवमध्ये 27 हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी, शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर चकरा
नोंदणी झाली मात्र खरेदी नाही? धाराशिवमध्ये 27 हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी, शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर चकरा
वाहनधारकांना दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य, वाहतूक पोलिसांना आदेश
वाहनधारकांना दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य, वाहतूक पोलिसांना आदेश
Devendra Fadnavis & Uddhav Thackeray: मोठी बातमी: 'सामना'च्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
देवाभाऊ, अभिनंदन! भाजपवर आग ओकणाऱ्या 'सामना'तून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
Ind vs Aus 5th Test : रोहित शर्माला वगळण्यात आले की स्वतः विश्रांती घेतली? जसप्रीत बुमराह म्हणाला, आमचा कर्णधार स्वार्थ नाही...
रोहित शर्माला वगळण्यात आले की स्वतः विश्रांती घेतली? जसप्रीत बुमराह म्हणाला, आमचा कर्णधार स्वार्थ नाही...
Upcoming IPO : स्टॅण्डर्ड ग्लासच्या आयपीओची जोरदार चर्चा,सबस्क्रिप्शन सुरु होण्यापूर्वीच जीएमपी 61 टक्क्यांवर
स्टॅण्डर्ड ग्लास लायनिंग टेक्नोलॉजीचा आयपीओ जोरदार चर्चेत, सबस्क्रिप्शनसाठी खुला होण्यापूर्वीच जीएमपी 61 टक्क्यांवर
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?

Gautam Gambhir : रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर?  गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर? गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी

Embed widget