एकीकडे उन्हाचा पारा वाढत असताना आसामला मात्र मुसळधार पावसान अक्षरश: झोडपून काढलं आहे.
2/8
मुसळधार पावसामुळं रेल्वे रूळ वाहून गेले आणि रेल्वे उलटल्याचंही चित्र पाहायला मिळालं. 57 हजार लोकांना या पावसाचा फटका बसला आहे.
3/8
मुसळधार पावसामुळे त्रिपुरा, मिझोरम आणि दक्षिण आसामशी जोडलेल्या 25 पेक्षा अधिक रेल्वे गाड्या भूस्खलनामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. या पुराचा सर्वाधिक फटका कछार भागात बसला आहे. जिल्ह्यात निमलष्करी दल, अग्निशमन, आपत्कालीन सेवा,आणि एसडीआरएफ जवानांना 2 हजार 200 जणांना वाचवण्यात यश आलं आहे.
4/8
आसामच्या धेमाजी, डिब्रुगड सह 24 जिल्ह्यांत पुरस्थिती उद्भवली आहे. 2 लाखांहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. तर भूस्खलन आणि पुरात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
5/8
सोमवारी प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, दिमा हासाओ (Dima Hasao) जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशात भूस्खलनामुळे रेल्वे आणि रस्ते संपर्क तुटल्यानं त्याचा उर्वरित राज्याशी संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.
6/8
आसाममध्ये पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुरात अडकलेल्या लोकांसाठी बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे.
7/8
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये 16 ठिकाणी बंधारे तुटल्याची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक भागात रस्ते, पूल आणि घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.
8/8
दिमा हासाओमधील लुमडिंग-बदरपूर सेक्शनवर गेल्या दोन दिवसांपासून भूस्खलन आणि रुळांवर पाणी साचल्यामुळे अडकलेल्या दोन गाड्यांमधील सुमारे 2,800 प्रवाशांना वाचवण्याचे काम सोमवारी सुरू होतं, ते पूर्ण झालं असून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे.