एक्स्प्लोर
Pahalgam Terror Attack: पंतप्रधान मोदी विमानातून उतरताच इंडियन जेम्स बाँड अजित डोवाल जवळ आले अन्....
Kashmir Pahalgam terror attack: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही वर्षांमधील हा मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे.
Kashmir Pahalgam terror attack PM Modi
1/10

काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी बुधवारी सकाळी तातडीने विमानाने दिल्लीत दाखल झाले.
2/10

पंतप्रधान मोदी हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. मात्र, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे वृत्त समजताच पंतप्रधान मोदी सौदीचा दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतले.
3/10

पंतप्रधान मोदी दिल्ली विमानळावर उतरताच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल त्यांना भेटले
4/10

आज दिल्लीत कॅबिनेटच्या सुरक्षाविषयक समितीची पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे.
5/10

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या श्रीनगरमध्ये आहेत. ते आज पहलगामला जाऊ शकतात.
6/10

दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगामचा परिसर निर्मनुष्य दिसत आहे.
7/10

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने 5 दहशतवाद्यांना शोधण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
8/10

पहलगामच्या हल्ल्यानंतर पर्यटक घाबरले आहेत. अनेक पर्यटक काश्मीर सोडून माघारी फिरु लागले आहेत.
9/10

अनेक पर्यटकांनी आज सकाळपासून काश्मीरमधील हॉटेल्स सोडायला सुरुवात केली.
10/10

काश्मीरमध्ये सध्या पर्यटनाचा हंगाम जोरात सुरु होता. मात्र, दहशतवादी हल्ल्यामुळे या सगळ्याचा विचका झाला आहे.
Published at : 23 Apr 2025 08:08 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
नाशिक
राजकारण























