एक्स्प्लोर
Karnataka Adiyogi Statue : हर हर महादेव! 'आदियोगी' शंकराची 112 फूट उंच मूर्ती, भव्य शिवमूर्तीचं लोकार्पण
Adiyogi Statue Karnataka : कर्नाटकातील नंदी टेकडीच्या पायथ्याशी आदियोगी शंकराच्या 112 फूट उंच मूर्तीचे अनावरण करण्यात आले. ही मूर्ती तामिळनाडू येथील शिवमूर्तीची प्रतिकृती आहे.
Karnataka Adiyogi Statue
1/12

कर्नाटकमध्ये (Karnataka) आदियोगी शिवशंकराच्या (Adiyogi Shiva Statue) 112 फूट उंच मूर्तीचे लोकार्पण करण्यात आले आहे.
2/12

कर्नाटकातील नंदी टेकडीच्या पायथ्याशी आदियोगी शंकराच्या भव्य मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.
3/12

रविवारी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर हा कार्यक्रम पार पडला आहे. ही मूर्ती तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे स्थापन करण्यात आलेल्या आदियोगी शंकराच्या मूर्तीची हुबेहूब प्रतिकृती आहे.
4/12

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते या आदियोगी मूर्तीचं अनावरण करण्यात आलं आहे. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सदगुरु हेही उपस्थित होते.
5/12

कर्नाटकच्या चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील नंदी हिल्स येथे असलेल्या ईशा फाऊंडेशनच्या आश्रम परिसरात आदियोगी शिवशंकराची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे.
6/12

भारतीय कला, संस्कृती आणि आध्यात्मिक परंपरांना चालना देण्यासाठी ईशा फाऊंडेशनकडून आश्रमाची स्थापना करण्यात आली आहे.
7/12

आदियोगी शंकराच्या पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोम्मई यांच्यासह अनेक दिग्गजांची हजेरी होती.
8/12

तामिळनाडूमध्ये भगवान शंकराची आदियोगी मूर्ती आहे. 112 फूट उंच मूर्ती तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे 2017 साली स्थापन करण्यात आली.
9/12

तामिळनाडूतील याच आदियोगी मूर्तीची हुबेहुब प्रतिमा आता कर्नाटकात स्थापन करण्यात आली आहे.
10/12

भगवान शंकराला आदियोगी म्हणजे प्रथम योगी असं म्हटलं जातं. ही मूर्ती तयार करण्यासाठी दोन वर्षे आणि आठ महिने कालावधी लागला.
11/12

तामिळनाडूतील आदियोगी शिवमूर्ती जगभरातील पर्यटकांसाठी हे एक प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थान आहे.
12/12

कर्नाटकातील आदियोगी शंकराच्या भव्य मूर्तीमुळे येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे.
Published at : 16 Jan 2023 12:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
आयपीएल
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
