एक्स्प्लोर
NISAR Satellite : पृथ्वीच्या वातावरणाचा सखोल अभ्यास करणार निसार सॅटेलाईट, ISRO आणि NASA चं संयुक्त अभियान
NISAR Satellite ISRO and NASA Space Mission : इस्त्रो (ISRO) आणि नासा (NASA) यांच्याकडून निसार सॅटेलाईट (NISAR Satellite) तयार करण्यात येत आहे.
NISAR Satellite ISRO and NASA Space Mission
1/15

भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO - Indian Space Research Organisation) आणि अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा (NASA) यांच्याकडून संयुक्त अभियान राबवण्यात येणार आहे.
2/15

निसार सॅटेलाईट (NISAR Satellite) इस्त्रो आणि नासा यांच्याकडून तयार करण्यात येत आहे. 2024 मध्ये याचे प्रक्षेपण करण्यात येण्याची शक्यता आहे.
3/15

निसार सॅटेलाईटची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सध्या नासाकडून हे सॅटेलाईट तयार करण्यात येत आहे. त्यानंतर पुढील कामासाठी हे सॅटेलाईट भारतात दाखल होईल.
4/15

नासाकडून सॅटेलाईट भारतात पाठवण्याची तयारी सुरु झाली आहे. फ्रेबुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत निसार सॅटेलाईट भारतात दाखल होणार आहे
5/15

निसार उपग्रह बनवण्याची इस्त्रो आणि नासा यांची संयुक्त मोहिम आहे. भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीचं हे आणखी एक उदाहरण आहे.
6/15

निसार उपग्रह पृथ्वीवरील जमीन आणि बर्फाच्छादित प्रदेश यांबाबतची अधिक माहिती मिळवण्यात मदत करेल. हे सॅटेलाईट अधिक खोल आणि विस्तृत निरीक्षण करेल.
7/15

लवकरच निसार सॅटेलाईट कॅलिफोर्नियातून भारतात दाखल होईल. सॅटेलाईट भारतात पाठवण्याआधी त्याच्या काही चाचण्या केल्या जातील.
8/15

इस्त्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांच्या देखरेखीखाली काही चाचण्या पार पडतील. यासाठी इस्त्रोचे अध्यक्ष 3 फेब्रुवारी रोजी कॅलिफोर्नियामध्ये दाखल झाले आहेत.
9/15

कॅलिफोर्नियामधील नासाच्या जेट प्रोपल्जन लॅबमध्ये (JPL) सॅटेलाईट भारतात रवाना करण्यापूर्वी परीक्षण करण्यात येत आहे. नासाकडून सॅटेलाईट भारतात पाठवण्याची तयारी सुरु आहे.
10/15

निसार उपग्रह पृथ्वीवरील जमीन आणि बर्फाच्छादित प्रदेशाबाबत अधिक माहिती मिळवण्यात मदत करेल.
11/15

इस्त्रो आणि नासा यांच्यात 2014 मध्ये 2,800 किलो वजनी उपग्रह बनवण्याचा करार झाला होता.
12/15

जेट प्रोपल्जन लॅबमध्ये (JPL) आयोजित एका कार्यक्रमात एस. सोमनाथ म्हणाले की, 'इस्त्रो आणि नासाची ही संयुक्त मोहीम एक वैज्ञानिक साधन म्हणून रडारच्या क्षमतेचे एक शक्तिशाली प्रात्यक्षिक असेल.
13/15

निसार उपग्रहाच्या मदतीने पृथ्वीच्या गतिमान जमीन आणि बर्फाच्या पृष्ठभागाचा पूर्वीपेक्षा अधिक तपशीलवार अभ्यास करण्यास मदत होईल, असंही सोमनाथ यांनी सांगितलं आहे.
14/15

निसार उपग्रह फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भारतात दाखल होईल. निसार उपग्रह 40 फूट व्यास एवढ्या आकाराचा आहे.
15/15

इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितले की, 'निसार उपग्रह संपूर्ण जगासाठी भारत-अमेरिका सहकार्याचे अभूतपूर्व उदाहरण ठरणार आहे.'
Published at : 07 Feb 2023 11:11 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























