एक्स्प्लोर
भीषण वास्तव! पाण्याच्या बचतीसाठी अर्ध्या गावाने अंघोळ करणे सोडलं, पाहा फोटो
Marathwada Water Shortage : पावसाने पाठ फिरवल्याने विहीर आटल्या, पिके करपली, मराठवाड्यातील (Marathwada) काही गावात तर पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची (Tanker) वाट पहावी लागते आहे.
Water shortage in Aurangabad
1/11

पावसाने पाठ फिरवल्याने ऐन पावसाळ्यात मराठवाड्यात टँकरची संख्या गेल्या महिन्यापेक्षा दीडपटीने वाढली आहे.
2/11

औरंगाबादच्या (Aurangabad) पैठण तालुक्यातील अंतरवली गावात तर आज अशी परिस्थिती आहे की, पाणी नसल्याने अर्धे लोकं अंघोळच करत नाही.
3/11

त्यामुळे आगामी काळात जोरदार पाऊस न झाल्यास परिस्थिती आणखीनच गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून याबाबत कोणत्या उपयोजना राबवल्या जाणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
4/11

आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण म्हणून ओळख असलेलं जायकवाडी धरण ज्या पैठण तालुक्यात आहे, तेथील पाण्याचा प्रश्न आता गंभीर होत चालला आहे.
5/11

कारण याच पैठण तालुक्यातील अंतरवली गावातील नागरिकांना भर पावसाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
6/11

अंदाजे 300 लोकांची वस्ती असलेल्या या अंतरवलीत 2 टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे दिवस निघाला की, पाण्याचं टँकर कधी येणार याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागलेले असतात.
7/11

एवढच काय तर पाण्याची बचत व्हावी म्हणून गावातील अर्ध्यापेक्षा अधिक लोकांनी रोज अंघोळ करणे सोडून दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
8/11

त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
9/11

तर जालना जिल्ह्यात 27 गावं आणि 18 वाड्यांवर 43 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
10/11

पावसाने पाठ फिरवल्यामुळे मराठवाड्यातील अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मराठवाड्यात आज घडीला एकूण 84 टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.
11/11

ज्यात औरंगाबाद जिल्ह्यात 30 गावं आणि 4 वाड्यांवर एकूण 41 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
Published at : 22 Aug 2023 04:07 PM (IST)
आणखी पाहा























