एक्स्प्लोर
Photo: विहिरीला मंजुरी मिळेना, सरपंचाने चक्क दोन लाखाच्या नोटा उधळल्या
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरच्या एका तरुण सरपंचांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Photo: विहिरीला मंजुरी मिळेना, सरपंचाने चक्क दोन लाखाच्या नोटा उधळल्या
1/9

हा तरुण सरपंच एका शासकीय कार्यालयासमोर नोटा उधळत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला.
2/9

फुलंब्री तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयाच्या समोरील हा व्हिडिओ असून, मंगेश साबळे असे या तरुण सरपंचाचे नाव आहे.
3/9

गटविकास अधिकारी यांनी विहीर मंजुरीसाठी लाचेची मागणी केल्याने, त्यांच्या कार्यालयासमोर दोन लाख रुपयांच्या नोटा उधळल्याचा दावा या सरपंचांने केला आहे.
4/9

विशेष म्हणजे त्याने गळ्यात नोटांचा हार घालत पंचायत समिती कार्यालयाच्या गेटवर पैसे उधळले असल्याचे पाहायला मिळाले.
5/9

वेगवेगळ्या शासकीय योजनांअंतर्गत शेतकऱ्यांना विहिरीसाठी अनुदान दिले जाते. सद्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात या योजनेसाठी शेतकरी अर्ज करत आहे.
6/9

मात्र फुलंब्री तालुक्यात अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांकडे यासाठी गटविकास अधिकारी यांच्याकडून पैसे मागितले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
7/9

दरम्यान असेच काही फुलंब्री तालुक्यातील गेवराई (पायगा) येथील गावकऱ्यांसोबत घडत असल्याचा आरोप या गावचा सरपंच मंगेश साबळे याने केला आहे.
8/9

त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी त्याने अनोखं आंदोलन केले आहे. तब्बल दोन लाख रुपयांच्या नोटाचा हार गळ्यात घालून तो पंचायत समितीच्या कार्यालयात दाखल झाला.
9/9

त्यानंतर त्या नोट्या कार्यालयाच्या परिसरात उधळून लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निषेध करत असल्याचा दावा केला.
Published at : 31 Mar 2023 04:50 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर
राजकारण























