आज हैदराबाद येथील इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक Pure EV ने EcoDryft इलेक्ट्रिक बाईक भारतात लॉन्च केली आहे.
2/8
कंपनीने स्वतः ही बाईक आधीच देशातील 100 हून अधिक डीलरशिपवर टेस्ट राइडिंगसाठी उपलब्ध करून दिली आहे.
3/8
ज्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही रिव्हॉल्ट इलेक्ट्रिक बाईक RV400 LA ला टक्कर देईल. या बाईकमध्ये कंपनीने अनेक जबरदस्त फीचर्स दिले आहे. याचबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
4/8
कंपनीने Pure EV बाईक 99,999 रुपये एक्स-शोरूमच्या प्रारंभिक किमतीत सादर केली आहे.
5/8
कंपनीने या इलेक्ट्रिक बाईकसाठी बुकिंग सुरू केली आहे. ग्राहक Pure EV च्या अधिकृत डीलरशिपद्वारे ही बाईक बुक करू शकतात.
6/8
याचबरोबर कंपनी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून या बाईकची डिलिव्हरी सुरू करणार आहे.
7/8
ही इलेक्ट्रिक बाईक एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर 135 किमीपर्यंतची रेंज देऊ शकते आणि 75 किमी/ताशी हाय स्पीडने धावू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. कॉम्प्युटर बाईक म्हणून बाईकच्या डिझाइनमध्ये अँगुलर हेडलॅम्प, पाच-स्पोक अलॉय व्हील आणि सिंगल-पीस सीट समाविष्ट आहे.
8/8
कंपनीने ही इलेक्ट्रिक बाईक चार रंग पर्यायसह लॉन्च केली आहे. यात ब्लॅक, ग्रे, ब्लू आणि रेड रंगाचा समावेश आहे.