Skoda Slavia भारतात लॉन्च, जबरदस्त फीचर्ससह किंमत आहे...
By : सतिश केंगार | Updated at : 28 Feb 2022 07:31 PM (IST)
2022-02-27-11-13-15-420
1/6
स्कोडा ऑटो इंडियाने आज नवी कोरी स्लाविया 1.0 टीएसआय सेडान भारतात लॉन्च केली आहे. कंपनीने आपल्या या नवीन गाडीची प्रारंभिक किंमत 10.69 लाख रुपये इतकी ठेवली आहे.
2/6
याच्या 1.5-लेटर लिटर टीएलआय व्हेरिएंटच्या किमतीचा खुलासा कंपनी 3 मार्च रोजी करणार आहे. भारतीय बाजारात या कारची स्पर्धा Honda City आणि Maruti Ciaz कारशी होईल.
3/6
खास भारतासाठी तयार करण्यात आलेल्या MQB A0 IN प्लॅटफॉर्मवर ही कार तयार करण्यात आली आहे. कंपनीने ही कार अॅक्टिव्ह, अॅम्बिशन आणि स्टाइल या तीन प्रकारांमध्ये लॉन्च केली आहे.
4/6
नवीन स्कोडा स्लावियामध्ये 16-इंच अलॉय व्हील, लांब व्हील बेस, व्हर्टिकल क्रोम फ्रंट ग्रिल, एल-आकाराचे हेडलाइट्स आणि रुंद एअर इनलेटसह बंपर सारखे फीचर्स देण्यात आले आहे. तसेच यात मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कनेक्टेड कार तंत्रज्ञान आणि ऑटो हेडलॅम्प देण्यात आले आहे.
5/6
कंपनीने यात 1.0 लिटर ३-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 115 पीएस पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे.
6/6
दुसऱ्या पर्यायामध्ये 1.5 लीटर 4 सिलेंडर TSI इंजिन देण्यात येणार आहे. हे इंजिन 150 पीएस पॉवर 250 एनएम टॉर्क जनरेट करेल.