एक्स्प्लोर
350 चे पॉवरफुल इंजिन, स्टायलिश लूक; Royal Enfield ची नवीन बाईक लॉन्च

Royal Enfield Hunter 350
1/6

प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी रॉयल एनफील्डने आपली नवीन अपडेटेड हंटर 350 बाईक भारतात लॉन्च केली आहे. याची किंमत 1.50 लाख रुपये ठेवण्यात आली असून याच्या टॉप व्हेरियंटची 1.69 लाख रुपये आहे. Royal Enfield Hunter 350 Retro आणि Metro या दोन व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीने यामध्ये बरेच नवीन फीचर्स आणि पॉवरफुल इंजिन दिले आहे. कंपनी लवकरच याची विक्री सुरू करू शकते.
2/6

Royal Enfield Hunter 350 मध्ये 349 cc इंजिन देण्यात आले आहे. जे 20.2 bhp पॉवर आणि 27 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ही बाईक 114 किमी/ताशी कमाल वेग देते. यासोबतच या इंजिनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.
3/6

हंटर 350 चे वजन 181 किलो आहे. जे क्लासिक 350 पेक्षा 14 किलो कमी आहे.या बाईक बॉडीत कंपनीने अनेक ठिकाणी प्लॅस्टिकचा वापर केले आहे. याच्या फ्रेममध्येही बदल करण्यात आला आहे. यात नवीन अलॉय व्हील देण्यात आले आहेत. ज्यामुळे याचे वजन कमी झाले आहे.
4/6

याच्या ब्रेकिंगबद्दल बोलायचे झाले तर पुढच्या चाकामध्ये 300 मिमी डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये 270 मिमी डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. मेट्रो व्हेरियंटमध्ये ड्युअल चॅनल एबीएस आणि रेट्रो सिंगल व्हेरिएंटमध्ये सिंगल चॅनल एबीएस देण्यात आला आहे. ही बाईक 150 मिमीच्या ग्राउंड क्लिअरन्ससह येते.
5/6

या बाईकमध्ये 17-इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहे. पुढची चाके 110/70-17 54P आणि 140/70 - 17 - 66P आहेत. यात ट्यूबलेस टायर बसवण्यात आले आहेत. याचा व्हीलबेस 1370 मिमी आहे आणि सीटची उंची 800 मिमी आहे.
6/6

रॉयल एनफील्ड हंटर 350 च्या डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर समोर टर्न सिग्नलसह एक गोलाकार एलईडी हेडलाइट आणि एक डिजिटल स्पीडोमीटर देण्यात आला आहे. यात टियरड्रॉप आकाराची क्रीजसह इंधन टाकी देण्यात आली आहे. तसेच बाजूच्या पॅनेलमध्ये हंटर 350 लोगो देण्यात आला आहे. यात ग्रॅब रेल आणि मागील बाजूस एलईडी टेललाइट आणि टर्न इंडिकेटर देण्यात आला आहे. ही बाईक अतिशय आकर्षक दिसते. कंपनीने याला अनेक रंग पर्यायांमध्ये लॉन्च केले आहे. ही बाईक फॅक्टरी ब्लॅक आणि फॅक्टरी सिल्व्हर रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Published at : 07 Aug 2022 11:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
