एक्स्प्लोर
नागपूरच्या महाराजबाग प्राणी संग्रहालयात नवा पाहुणा, 'जान' वाघिणीला जोडीदार मिळाला!
1/6

एनटी 1 च्या आगमनाने गेली तीन वर्ष एकाकी जीवन जगणाऱ्या जान या वाघिणीच्या जीवनात ही नवे बदल होणार असून दोघांच्या साथीने महाराजबाग प्राणी संग्रहालयात नवं चैतन्य पसरेल, अशी अपेक्षा प्राणी संग्रहालय प्रशासनासह नागपूरकरांनाही आहे.
2/6

सध्या एनटी 1 या वाघाला प्राणी संग्रहालयातील वातावरणाशी जुडवून घेण्यासाठी पुरेशा वेळ दिला जाणार असून त्याला लगेच पर्यटकांसमोर आणले जाणार नाही. दरम्यान प्राणी संग्रहालयात आणल्या गेल्यानंतर एनटी 1 काहीसा आक्रमक झाला असून सतत त्याची डरकाळी ऐकू येत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
3/6

गोरेवाडामधील वन्यजीव बचाव केंद्रातून एनटी 1 वाघाला एका मोठ्या पिंजऱ्यातून महाराजबाग प्राणी संग्रहालयात आणले. जान या वाघिणीच्या रुपात नव्या जोडीदाराची भेट होणार आहे कदाचित याच पूर्व अंदाजाने एनटी 1 लगेच पिंजऱ्यात आला आणि महाराजबागेत आणल्यानंतरही तो त्याच्या पिंजऱ्यातून मोठ्या पिंजऱ्यात लगेच गेला. त्यामुळे प्राणी संग्रहालयातील अधिकाऱ्यांना फारशी वाट बघावी लागली नाही.
4/6

नुकतंच महाराजबाग प्राणी संग्रहालयाचे मास्टर प्लॅन मंजूर करताना केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने वाघिणीला जोडीदार आणण्याची अट घातली होती. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड-तळोदी वनपरिक्षेत्रातून जेरबंद करून 'एनटी 1' नावाच्या वाघाला नागपुरातील गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात आणले होते. आता वन विभागाच्या मान्यतेने त्याच एनटी 1 वाघाला महाराजबाग प्राणी संग्रहालयात पाठवण्यात आले आहे.
5/6

नागपूर शहराच्या केंद्रात वसलेले महाराजबाग प्राणी संग्रहालय अनेक दशके जुने असून इथे मोठ्या संख्येने प्राणी आहेत. मात्र, 2016 पासून इथे जंगलाचा राजा म्हणजे वाघच नव्हता. त्यामुळे महाराजबागेकडे पर्यटकांनीही पाठ वळवली होती. 2016 पर्यंत महाराजबाग प्राणी संग्रहालयात एका वाघासह दोन वाघिणीही होत्या. मात्र, 2016 मध्ये साहेबराव नावाच्या वाघाला पुनर्वसनासाठी प्राणी संग्रहालयाच्या बाहेर पाठवण्यात आले. तर 2017 मध्ये ली नावाच्या वाघिणीलाही प्राणी संग्रहालयातून इतरत्र पाठवण्यात आलं. त्यामुळे गेली तीन वर्षे जान ही वाघीण एकटी पडली होती.
6/6

नागपूरच्या महाराजबाग प्राणी संग्रहालयात वाघाच्या रुपाने नवा पाहुणा आला आहे. 'एनटी 1' नावाच्या या वाघाच्या रुपाने प्राणी संग्रहालयात आधीपासून असलेल्या 'जान' या वाघिणीला नवा जोडीदार मिळाला आहे. त्यामुळे वाघ-वाघिणीच्या या जोडीमुळे महाराजबागेत नवं चैतन्य पसरुन पर्यटकांची पावले पुन्हा एकदा इथे वळतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Published at :
आणखी पाहा























