एक्स्प्लोर
Brain Power Boosting Tips : ब्रेन पॉवर वाढवण्यासाठी , 'या' सोप्या टिप्स करा फाॅलो
तणावाचा मेंदूवर वाईट परिणाम होतो, त्यामुळे कधीही जास्त ताण घेऊ नका. हे आरोग्यासाठी चांगले नाही.
Brain Power Boosting Tips
1/10

ब्रेन पॉवर वाढवण्यासाठी काय करणे गरजेचे आहे ते आपण पाहूयात.
2/10

शारीरिक हालचाली केल्याने मेंदू निरोगी राहतो. सकाळी उठल्यानंतर दररोज शारीरिक व्यायाम केल्याने मेंदू निरोगी आणि ताजेतवाने राहतो. शारीरिक हालचाली केल्याने मेंदु चांगले काम करू शकतो.
3/10

निरोगी शरीरासाठी पोषक तत्वे खूप महत्त्वाची असतात. चांगले पोषण तुमच्या मनाला तसेच शरीराला मदत करते. ब्रेन पॉवर वाढवण्यासाठी पौष्टिक ताज्या भाज्या रोज खाव्यात.
4/10

ब्रेन पॉवर वाढवण्यासाठी हिरव्या भाज्या रामबाण उपाय आहेत. रोज पालेभाज्या खा. त्यात असे अनेक पोषक घटक आढळतात जे मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. व्हिटॅमिन के, बीटा कॅरोटीन, फोलेट, व्हिटॅमिन ई इत्यादी हिरव्या भाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात.
5/10

बीन्स हे व्हिटॅमिन बीचे चांगले स्रोत आहेत. रोज किमान अर्धा कप बीन्स खाल्ल्यास मेंदूच्या आरोग्याला खूप फायदा होतो. रोज बदाम खाल्ल्याने मेंदू निरोगी आणि तंदुरुस्त राहतो.
6/10

पुरेशी झोप घेतल्याने ब्रेन पॉवर वाढते. यामुळे तुमचा अभ्यास चांगला होण्यास मदत होते.
7/10

ध्यान हे निरोगी शरीर आणि मनासाठी रामबाण उपाय आहेत. ध्यान केल्याने मनाला शांती मिळते, त्यामुळे ब्रेन पॉवर मजबूत होते.
8/10

तंबाखू आणि अल्कोहोलच्या सेवनाने मेंदूवर परिणाम तर होतोच, पण त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. तुम्हालाही तुमची ब्रेन पॉवर वाढवायची असेल तर आजच त्याचे सेवन बंद करा.
9/10

अक्रोड हे मेंदूसाठीही फायदेशीर मानले जाते. हे मेंदूसाठी खूप आरोग्यदायी आहे. अक्रोड खाल्ल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई, कॉपर आणि मॅंगनीज असते, ज्यामुळे मेंदूची शक्ती वाढते.
10/10

ब्लूबेरी हे मेंदूसाठी खूप फायदेशीर फळ मानले जाते. मेंदूच्या आरोग्यासाठी याला यादीत वरच्या क्रमांकावर ठेवता येईल. त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, मॅंगनीज, फायटोन्यूट्रिएंट्स इत्यादी मुबलक प्रमाणात आढळतात. हे मेंदूमध्ये रक्त प्रवाह वाढविण्यासाठी आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी वापरले जाते.
Published at : 30 Sep 2023 02:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
परभणी
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
