एक्स्प्लोर
Ashadhi Wari 2023: 'पांडुरंगाच्या चरणी अभिनव सायकलवारी', छ.संभाजीनगरमधून चाळीस सायकलस्वार पंढरपूरला
Ashadhi wari 2023 : छत्रपती संभाजीनगरच्या ( Chhatrapati Sambhaji Nagar) सायकलिंग फाउंडेशनच्या पुढाकाराने सायकलवारी काढण्यात आली होती.
'पांडुरंगाच्या चरणी अभिनव सायकलवारी', छ.संभाजीनगरमधून चाळीस सायकल स्वरांचा ग्रुप पंढरपूरला
1/7

पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर येथून सायकलिंग फाउंडेशनच्या माध्यमातून चाळीस जणांचा ग्रुप नुकताच पंढरपूर वारी सायकलवर करून यशस्वीपणे परतला आहे.
2/7

9 जून रोजी छत्रपती संभाजीनगरयेथून सायकलिंग फाउंडेशनचे डॉ. दिपक कुंकलोळ आणि डॉ. सुदाम बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोबत 40 सायकलस्वार सदस्यांचा ग्रुप पंढरपूरकडे रवाना झाला होता.
3/7

या दरम्यान त्यांनी बीड जिल्ह्यातील चौसाळा या ठिकाणी मुक्काम केला होता.
4/7

सकाळी पहाटेच दहा तारखेला पुन्हा सायकल प्रवासात सुरुवात करून हा ग्रुप सायंकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान यशस्वीपणे पंढरपूरला पोहोचला.
5/7

तिथे सायकलवरच विठ्ठलाच्या मंदिराला प्रदक्षिणा घातली व रेल्वे मैदान येथे आगळे वेगळे सायकल रिंगण करून पंढरपुरा प्रति आपली भक्ती अर्पण केली.
6/7

अनोख्या सायकल वारीचे यंदाचे हे दुसरे वर्ष होते पुढच्या वारीला आणखी जास्त सदस्यांचा सहभाग आणि सहवास लाभणार असल्याची माहिती डॉ.दीपक कुंकलोळ यांनी दिली.
7/7

या सायकलिंग फाउंडेशनच्या माध्यमातून निसर्गाप्रती आपली आत्मीयता आणि आपल्या आरोग्य विषयी जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने आणि भगवान विठ्ठलाच्या चरणी लीन होण्यासाठी सायकल हे माध्यम निवडण्यात आले.
Published at : 20 Jun 2023 07:09 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
























