एक्स्प्लोर
Lifestyle : घामाच्या वासापासून त्रस्त आहात ? हे घटक अंघोळीच्या पाण्यात मिसळा !
Lifestyle :उन्हाळ्यात घाम येणे सामान्य गोष्ट आहे,अशा परिस्थितीत शरीरातून दुर्गंधी येऊ लागते.तुम्हाला सतत घाम येत असेल आणि वास येत असेल तर काळजी करण्याची गरज नाही.

उन्हाळ्यात घाम येणे सामान्य गोष्ट आहे,अशा परिस्थितीत शरीरातून दुर्गंधी येऊ लागते.जे कधी कधी लाजिरवाणे ठरते. परफ्यूम लावल्यानंतरही तुम्हाला सतत घाम येत असेल आणि वास येत असेल तर काळजी करण्याची गरज नाही.(Photo Credit : pexels)
1/9
![आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही पाण्यात टाकून अंघोळ करून घामाच्या वासापासून सुटका मिळवू शकता.[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/05/939d016a290233dc8674c7853ed41314b8c94.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही पाण्यात टाकून अंघोळ करून घामाच्या वासापासून सुटका मिळवू शकता.[Photo Credit : Pexel.com]
2/9
![गुलाब पाण्याचा वापर : अंघोळ करताना पाण्यात गुलाबजल टाकू शकता. यामुळे तुमच्या शरीरातील दुर्गंधी दूर होईल आणि तुमची त्वचा सुंदर दिसेल. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/05/2b232b6cf88e0ee155f3e0c63eebc8357ba2d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गुलाब पाण्याचा वापर : अंघोळ करताना पाण्यात गुलाबजल टाकू शकता. यामुळे तुमच्या शरीरातील दुर्गंधी दूर होईल आणि तुमची त्वचा सुंदर दिसेल. [Photo Credit : Pexel.com]
3/9
![लिंबाचा रस : पाण्यात लिंबाचा रसही टाकू शकता. असे केल्याने शरीरातील बॅक्टेरिया मरतात आणि दुर्गंधी दूर होते. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/05/85808b6ba64d059ec3fc0248021052a1866ed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लिंबाचा रस : पाण्यात लिंबाचा रसही टाकू शकता. असे केल्याने शरीरातील बॅक्टेरिया मरतात आणि दुर्गंधी दूर होते. [Photo Credit : Pexel.com]
4/9
![जर तुम्हाला स्वतःची दुर्गंधी दूर करायची असेल आणि सुंदर दिसायचे असेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात चंदन पावडर देखील टाकू शकता. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/05/3f228b5d13f24a943c89e07fc6e909b00cde6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जर तुम्हाला स्वतःची दुर्गंधी दूर करायची असेल आणि सुंदर दिसायचे असेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात चंदन पावडर देखील टाकू शकता. [Photo Credit : Pexel.com]
5/9
![पुदिन्याची पाने : पुदिन्याची पाने उन्हाळ्यात त्वचेला चमकदार बनविण्यास आणि शरीराला थंडावा देण्यास मदत करतात. दुर्गंधी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांना मारण्यातही ते खूप मदत करते. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/05/827ea4690f66f91382a05f0a778bbbfa9150a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुदिन्याची पाने : पुदिन्याची पाने उन्हाळ्यात त्वचेला चमकदार बनविण्यास आणि शरीराला थंडावा देण्यास मदत करतात. दुर्गंधी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांना मारण्यातही ते खूप मदत करते. [Photo Credit : Pexel.com]
6/9
![याशिवाय तुम्ही आंघोळीच्या पाण्यात लॅव्हेंडर तेल टाकू शकता, यामुळे त्वचा सुगंधित होते. या सर्व गोष्टी वापरण्यापूर्वी एकदा पॅच टेस्ट करून घ्या. जर ते तुमच्या त्वचेला शोभत नसेल तर तुम्ही त्यांचा वापर थांबवावा.[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/05/961e77cb616301d4b3f67c9a382b7b113991c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याशिवाय तुम्ही आंघोळीच्या पाण्यात लॅव्हेंडर तेल टाकू शकता, यामुळे त्वचा सुगंधित होते. या सर्व गोष्टी वापरण्यापूर्वी एकदा पॅच टेस्ट करून घ्या. जर ते तुमच्या त्वचेला शोभत नसेल तर तुम्ही त्यांचा वापर थांबवावा.[Photo Credit : Pexel.com]
7/9
![या गोष्टी लक्षात ठेवा : या गोष्टी पाण्यात मिसळून आंघोळ केल्याने घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळते. परंतु या गोष्टी मर्यादित प्रमाणात वापरण्याचे लक्षात ठेवा. अति वापरामुळे काही लोकांना समस्या निर्माण होऊ शकतात. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/05/b18e793546e2d1b97451c33a313809bdda4ee.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या गोष्टी लक्षात ठेवा : या गोष्टी पाण्यात मिसळून आंघोळ केल्याने घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळते. परंतु या गोष्टी मर्यादित प्रमाणात वापरण्याचे लक्षात ठेवा. अति वापरामुळे काही लोकांना समस्या निर्माण होऊ शकतात. [Photo Credit : Pexel.com]
8/9
![याशिवाय आंघोळीनंतर हवे असल्यास अंगावर मॉइश्चरायझर किंवा लोशन लावू शकता. लक्षात ठेवा की काही लोकांना या गोष्टींची ऍलर्जी असू शकते असे होत असल्यास,नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/05/62ba00749b5501795831a382f8cf7ebc2ece6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याशिवाय आंघोळीनंतर हवे असल्यास अंगावर मॉइश्चरायझर किंवा लोशन लावू शकता. लक्षात ठेवा की काही लोकांना या गोष्टींची ऍलर्जी असू शकते असे होत असल्यास,नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.[Photo Credit : Pexel.com]
9/9
![टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/05/8cbc7ae7f19616e84da37f8dfea005d72d2a1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : Pexel.com]
Published at : 05 May 2024 03:28 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
