एक्स्प्लोर
Kitchen Tips : कारल्याच्या भाजीचा कडूपणा घालवण्यासाठी खास सोप्या टिप्स!

bitter guard
1/6

कारल्याची भाजी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, पण काही लोक ती कडूपणामुळे खात नाहीत. आज आम्ही तुम्हाला कारल्याचा कडूपणा दूर करण्याच्या टिप्स सांगणार आहोत. यामुळे कारल्याची भाजी अजिबात कडू होणार नाही.
2/6

सर्व प्रथम कारल्याची साल सोलून घ्या. कडवटपणा दूर करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. कारल्याची संपूर्ण कडू त्वचा काढून टाका. त्यातच सर्वात जास्त कडूपणा असतो. या सालींमध्ये थोडे मीठ टाकून उन्हात वाळवा आणि मसाला लावून तळून खा. भरलेली कारली बनवताना त्याचा सारणात वापर करता येतो.
3/6

कारल्याचा कडूपणा दूर करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे कारल्याची भाजी करताना त्यातील सर्व बिया काढून टाकणे. कारल्याच्या बियांमध्येही कडूपणा असतो. त्यामुळे भाजी चिरत असताना त्यातील बिया चमच्याच्या सहाय्याने काढून टाका.
4/6

कारले बनवण्याआधी थोडावेळ मीठ लावून ठेवा, याने कारल्याचा कडूपणा दूर होईल. कारल्याचा कडू रस मिठात असणाऱ्या खनिजांमुळे बाहेर पडतो. कारल्याला साधारण 20 ते 30 मिनिटे मीठ लावून ठेवा. त्यानंतर कारले धुवून घ्या. आता तुमची भाजी कडू होणार नाही.
5/6

कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी तुम्ही भाजीत दही देखील वापरू शकता. यासाठी कारल्याचे छोटे तुकडे करून 1 तास दह्यात ठेवा. याने कारल्याचा कडूपणा निघून जातो आणि दह्यामधून बाहेर काढल्यानंतर कारल्याची भाजी करा.
6/6

जर तुम्ही कारल्याची सुकी भाजी बनवत असाल तर त्यात कांदा आणि बडीशेप वापरा. यामुळे भाजीचा कडूपणा दूर होईल. यासाठी प्रथम तेलात बडीशेप घाला आणि नंतर कांदा थोडा मोठा कापून घाला. आता कारले आणि मीठ घालून परतून घ्या. त्यानंतर थोडी आमचूर पावडर घाला. यामुळे भाजी अजिबात कडू होणार नाही.
Published at : 16 Apr 2022 01:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
