एक्स्प्लोर
How To Get Glowing Skin : जाणून घेऊया संत्र्याचा फेस पॅक कसा बनवायचा?
संत्र्यामध्ये असे अनेक गुणधर्म आहेत जे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यास मदत करतात.

(photo:/unsplash.com/)
1/10

संत्री हे एक रसाळ फळ आहे ज्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. जर तुम्ही चेहऱ्यावर संत्र लावले तर ते तुमची त्वचा खोलवर स्वच्छ करते, ज्यामुळे तुमचा रंगही सुधारतो.
2/10

म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी ऑरेंज फेस पॅक बनवण्याची पद्धत घेऊन आलो आहोत.
3/10

संत्र्यामध्ये असे अनेक गुणधर्म आहेत जे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यास मदत करतात. म्हणूनच, जर तुम्हाला दीर्घकाळ सुंदर आणि तरुण दिसायचे असेल, तर तुमच्या त्वचेच्या काळजीमध्ये संत्र्याचा अवश्य समावेश करा, चला तर मग जाणून घेऊया संत्र्याचा फेस पॅक कसा बनवायचा-
4/10

ऑरेंज फेस पॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य- संत्र्याचा रस 1 कप, दूध पावडर 1 टीस्पून, बेसन 1 टीस्पून
5/10

संत्र्याचा फेस पॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम संत्र्याचा रस काढा. नंतर त्यात 1 चमचा दुधाची पावडर आणि 1 चमचा बेसन घाला.
6/10

यानंतर या सर्व गोष्टी नीट मिसळा. आता तुमचा ऑरेंज फेस पॅक तयार आहे.
7/10

हा फेस पॅक लावण्यासाठी, आपला चेहरा पूर्णपणे धुवा. मग हा पॅक चांगला सुकेपर्यंत ठेवा. यानंतर टॉवेल ओला करून चेहरा स्वच्छ करा.
8/10

सर्वोत्तम परिणामांसाठी, तुम्ही आठवड्यातून एकदा हा फेस पॅक लावा.
9/10

याच्या वापराने तुमची त्वचा चमकू लागते.
10/10

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोण तेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (photo:/unsplash.com/)
Published at : 19 Jan 2023 04:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बीड
व्यापार-उद्योग
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
