एक्स्प्लोर
Travel Tips : नवीन वर्षात फिरण्याची इच्छा पण फ्लाईट तिकीट आहे जास्त? 'या' 6 टिप्स वापरून स्वस्तात विमान प्रवास करा
Tour Planning in Budget : नवीन वर्षात प्रवास करण्याची आणि पैसे वाचवण्याची इच्छा आहे? तर स्वस्त विमान तिकीट खरेदी करण्यासाठी 'या' 6 टिप्स नक्की वापरा.
Get Flight Ticket at Low Price
1/11

Flight Ticket at Cheap Price : नवीन वर्षाची चाहूल लागली आहे. जर तुम्हाला नवीन वर्ष साजरे करण्यासाठी बाहेर फिरण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. (PC : istock)
2/11

नवीन वर्षात प्रवास करू इच्छिता आणि पैसे वाचवण्याची इच्छा असेल तर हे वाचा. छोट्या-छोट्या टिप्समुळे काम सोपं होतं. (PC : istock)
3/11

फ्लाइट तिकीट स्वस्तात कसं खरेदी करावं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या टिप्स वापरल्यामुळे तुम्हाला पैसे वाचविण्यात मदत होईल. (PC : istock)
4/11

नवीन वर्षात सहलीला जायचं आहे आणि पैसेही वाचवायचे आहेत? तर जाणून घ्या स्वस्त विमान तिकीट खरेदी करण्यासाठीच्या टिप्स कोणत्या आहेत. (PC : istock)
5/11

सोमवार सकाळपासून गुरुवार सकाळपर्यंतची वेळ 'ऑफ पीक ट्रॅव्हल' वेळ मानली जाते. जर तुम्ही यावेळी फ्लाइट बुक केली तर स्वस्त फ्लाइट मिळण्याची शक्यता वाढेल. (PC : istock)
6/11

फ्लाइट सर्च इंजिन वापरा. तुम्ही वेगवेगळ्या साइटवर फ्लाइट तिकीट तपासण्यासाठी एग्रीगेटर साइट वापरू शकता. (PC : istock)
7/11

चेकआउटच्या वेळी ऑफर तपासा. कोणत्याही वेबसाईटवर चेक आउट करण्यापूर्वी, तुम्हाला कोणत्याही वॉलेटच्या बँक कार्डवर ऑफर मिळत आहेत का ते तपासा. (PC : istock)
8/11

तसेच, तुमच्याकडे कोणतंही कूपन आहे का ते देखील तपासा, यामुळे देखील तुम्हाला किमतीत सूट मिळू शकते. (PC : istock)
9/11

प्राईज अलर्ट सेट करा. विशिष्ट फ्लाइटच्या किंमतीसाठी प्राईज अलर्ट सेट करा. यामुळे, तिकिटाटी किंमत कमी होताच तुम्हाला सूचना मिळेल आणि तुम्ही स्वस्त विमान तिकीट बुक करू शकाल. (PC : istock)
10/11

आगाऊ बुकींग करा. एअरलाइन्स प्रवासाच्या तारखेच्या एक वर्ष आधीच बुकींग्स ऑफर केल्या जातात. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुक करा. कारण, प्रवासाची तारीख जितकी जवळ येईल तितकी तिकीटे महागण्याची शक्यता जास्त असते. (PC : istock)
11/11

इनकॉग्निटो मोड वापरा. जर तुम्ही फ्लाइट तिकिटांचा सतत शोध घेत असाल, तर एअरलाइन्स त्यांच्या रेकॉर्डमध्ये ठेवत तिकीटांचे भाडे वाढवू लागतात. हे टाळण्यासाठी, तुम्ही इनकॉग्निटो मोड किंवा प्रायवेट मोड वापरू शकता. (PC : istock)
Published at : 31 Dec 2023 01:49 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
























