एक्स्प्लोर
त्वचेसाठी नारळाचं तेल किती उपयोगी? जाणून घ्या!
नारळाचं तेल हे त्वचेच्या निगेसाठी एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे. यात व्हिटॅमिन E, फॅटी अॅसिड्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात.
नारळाचं तेल
1/9

नारळाचं तेल हे आपल्या घराघरात सहज उपलब्ध असलेलं आणि त्वचेसाठी फार उपयोगी ठरणारं नैसर्गिक औषध आहे
2/9

त असलेले फॅटी अॅसिड्स आणि व्हिटॅमिन E त्वचेचं नैसर्गिक पोषण करतात.
3/9

कोरडी त्वचा असणाऱ्यांसाठी हे एक उत्तम मॉइश्चरायझर ठरू शकतं. नारळाचं तेल त्वचेतील ओलावा टिकवून ठेवतं, त्यामुळे त्वचा मऊ व लवचिक राहते.
4/9

यातील अँटीबॅक्टेरियल व अँटीफंगल गुणधर्म लहानसहान फोड, पुरळ, खाज किंवा जळजळ यावर आराम देतात
5/9

नियमित मसाज केल्यास रक्ताभिसरण सुधारतं आणि त्वचेला नैसर्गिक टवटवी मिळते. तसेच, सुरकुत्या व वृद्धत्वाची लक्षणं कमी करण्यासही नारळाचं तेल मदत करतं.
6/9

उन्हामुळे किंवा प्रदूषणामुळे झालेली त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी हे फायदेशीर आहे.
7/9

अगदी नैसर्गिक लिप बाम, डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करणारा मसाज ऑइल किंवा मेकअप रिमूव्हर म्हणूनसुद्धा नारळाचं तेल वापरता ये
8/9

मात्र, तेलकट त्वचा किंवा मुरुमांची समस्या असणाऱ्यांनी याचा वापर मर्यादित प्रमाणात करावा. वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करणं उत्तम.
9/9

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 16 Aug 2025 04:22 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























