एक्स्प्लोर
Tomato : लाल-लाल टोमॅटो आरोग्यासाठी गुणकारी तितकाच घातकही; वाचा याचे तोटे
Tomato : टोमॅटोमध्ये कॅलरी कमी आणि पौष्टिकता भरपूर असते. यामध्ये व्हिटॅमिन सी, फॉस्फरस, कॅल्शियम आणि पोटॅशियम सारखे आवश्यक पोषक घटक आढळतात

Tomato
1/9

टोमॅटोचे फायदे तसेच अनेक तोटेही आहेत. हे तोटे कोणते ते जाणून घ्या.
2/9

टोमॅटो आम्लयुक्त असतात, जे तुमच्या पोटात अधिक गॅस्ट्रिक अॅसिड तयार करण्याचे काम करतात.
3/9

जास्त टोमॅटो खाल्ल्याने छातीत जळजळ किंवा ऍसिड रिफ्लक्स होऊ शकतात.
4/9

टोमॅटोचे जास्त सेवन केल्याने सांधेदुखी आणि एडेमाची समस्या उद्भवू शकते.
5/9

कारण टोमॅटोमध्ये सोलॅनिन नावाचा अल्कलॉइड असतो. यामुळे सांध्यांना सूज आणि वेदना होऊ शकतात. टोमॅटो ऊतींमध्ये कॅल्शियम तयार करतात, ज्यामुळे पुढे जळजळ होऊ शकते.
6/9

टोमॅटोमध्ये आढळणारा हिस्टामाइन हा घटक त्वचेवर पुरळ किंवा ऍलर्जीची समस्या निर्माण करू शकतो.
7/9

जास्त प्रमाणात टोमॅटोचे सेवन केल्याने तुमची समस्या आणखी वाढू शकते. तोंड, चेहरा आणि जिभेला सूज येणे, घशातील संसर्ग यांसारख्या ऍलर्जीच्या प्रतिक्रिया जाणवू शकतात.
8/9

किडनीचे आजार असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय टोमॅटोचे सेवन करू नये. कारण त्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. टोमॅटो, टोमॅटो सॉस, टोमॅटो सूप आणि इतर टोमॅटो-आधारित पदार्थांचे सेवन टाळल्याने रक्तातील पोटॅशियमची उच्च पातळी कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे गंभीर मूत्रपिंड समस्या उद्भवू शकतात.
9/9

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 08 Jan 2023 08:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
गोंदिया
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
