तुम्हाला जर घरबसल्या वजन कमी करायचं असेल तर आहारात कांद्याचा (Onion) समावेश करा. कांद्याचे सेवन केल्यानं तुमचे वजन कमी होऊ शकते. जाणून घेऊयात कांदा खाण्याचे फायदे....
2/7
कांद्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. एक कप चिरलेल्या कांद्यामध्ये जवळपास तीन ग्रॅम फायबर असते. त्यामुळे रोजच्या आहारात तुम्ही कांद्याचा समावेश करु शकता.
3/7
कांद्यामध्ये असणारे सॉल्यूबल फाइबर हे क्रेविंग कमी करते. त्यामुळे तुमचे वजन वाढणार नाही.
4/7
कांद्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. एक कप चिरलेल्या कांद्यामध्ये जवळपास 64 कॅलरी असतात. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे ते कांद्याचे सेवन करु शकतात.
5/7
कांद्यामध्ये क्वेर्सेटिन नावाचे वनस्पतीसारखे गुणधर्म आहेत. हे एक फ्लेव्होनॉइड आहे ज्यामध्ये लठ्ठपणाविरोधी गुणधर्म आहेत. यामुळे तुमचे शरीर निरोगी राहिल.
6/7
कांद्याचे सूप बनविण्यासाठी एका पॅनमध्ये एक छोटा चमचा तेल आणि दोन लसुन टाकाय त्यानंतर दोन चिरलेले कांदे टाका. त्यानंतर आर्धा कप तुम्हाला आवडतील त्या भाज्या त्यामध्ये टाका. 2-5 मिनीट हे मिश्रण गॅसवर ठेवा. त्यानंतर यामध्ये थोडं पाणी मिक्स करुन त्यामध्ये मिठ आणि मिर्ची टाका. हे सूप गरम असताना प्या.
7/7
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.