एक्स्प्लोर
Mental Stress: कामाचा ताण कसा कमी करावा याचा विचार करताय? 'या' टिप्स ठरतील फायदेशीर
Health Tips: अनेक जणांना कामामुळे मानसिक ताण जाणवतो, यामुळे चिडचिड होते. तर कधी घरच्यांवरही हा राग निघतो. तर अशा वेळी मानसिक ताण कमी करायचा कसा? यासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता.

How to reduce work stress?
1/9

मानसिक ताण वाढल्याने लोकांमध्ये चिडचिडेपणा वाढतो. राग आणि निद्रानाश यासारख्या समस्याही वाढतात, त्यामुळे मानसिक ताणावर वेळीच आवर घालणं आवश्यक आहे.
2/9

जीवनशैली आणि काम करण्याच्या पद्धतीत थोडे बदल करून तणाव दूर करता येतो. तणाव कमी करण्यासाठी तुम्ही चांगल्या लोकांच्या सहवासात राहा.
3/9

ताणतणावातून सुटका मिळवायची असेल तर एकटं न राहता मित्रांसोबत बाहेर वेळ घालवा, असं केल्याने तुम्हाला चांगलं वाटेल.
4/9

योगा करा. योगा केल्याने तुम्हाला तणावापासून मुक्ती मिळू शकते.
5/9

कामाचा जास्तच ताण जाणवल्यास मधल्या वेळी गाणी ऐका. थोडा वेळ लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या स्क्रिनपासून दूर राहा.
6/9

व्यस्त जीवनात स्वत: साठी काही वेळ द्या. तुमचे छंद जोपासा, आवडत्या गोष्टी करा.
7/9

तुमचा डाएट प्लॅन चांगला ठेवा, यामुळे ताण कमी होण्यास मदत होते.
8/9

ताणतणावात दारु पिऊ नका, यामुळे काही काळ बरं वाटलं तरी तुमच्या शरीराची हानी होते.
9/9

तणावात असताना धूम्रपान करणं देखील टाळा, यामुळेही तुमच्या शरीरावर परिणाम होईल.
Published at : 18 Sep 2023 07:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
सोलापूर
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
