यशचे खरे नाव नवीन कुमार गौडा आहे. त्याचा जन्म 8 जानेवारी 1986 साली कर्नाटकातील हासन जिल्ह्यात झाला. त्याला एक लहान बहिण आहे.
2/9
त्यानंतर यशने अनेक हिट चित्रपटे दिली. त्याचा 'गुगली' हा चित्रपट कन्नड इन्डस्ट्रीचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. पण खऱ्या अर्थाने यशला नाव मिळवून दिलं ते 2014 साली प्रदर्शित झालेल्या 'मिस्टर अॅन्ड मिसेस रामाचारी' या चित्रपटाने.
3/9
वडिलांच्या समजवण्यानंतर यशने आपले शिक्षण पूर्ण केलं. पण अभिनयाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो बेंगलुरुला आला. तिथेच त्याने नाटकात काम करायला सुरुवात केली. एका टीव्ही मालिकेतही काम केलं. त्याने अनेक चित्रपटात सपोर्टिंग रोल केले. 2007 साली Jambada Hudugi या कन्नड चित्रपटाच्या माध्यमातून त्याने पहिल्यांदा मुख्य भूमिका केली.
4/9
यशने त्याच्या करिअरच्या सुरुवातीला बेंगलुरुमध्ये नाटकात काम केलं होतं. त्याला शिक्षणात रस नव्हता पण त्याच्या वडिलांनी सांगितलं की शिकला नाहीस तर त्यालाही बस चालवायला लागेल.
5/9
इतके वर्षे फिल्म इन्डस्ट्रीमध्ये काम केल्यानंतरही यश कोणत्याही वादात सापडला नाही. तो राधिका पंडित या अभिनेत्रीशी रिलेशनशिपमध्ये होता. पुढे तिच्याशी त्याने लग्न केलं. हे जोडपं सामाजिक कामात अग्रेसर असतं.
6/9
यश आजही एका मिडल क्लास परिवाराप्रमाणे जीवन जगतोय. यश आज मोठा स्टार असला तरी त्याचे वडील आजही बस ड्रायव्हिंग करतात.
7/9
इन्डस्ट्रीमध्ये आल्यानंतर त्याच्या खिशात केवळ 300 रुपये होते. पण आता 300 कोटी बजेट असणाऱ्या चित्रपटांची पहिली पसंती यशला असते
8/9
KGF स्टार यशचा डंका आता पूर्ण देशात वाजत आहे. त्याने कन्नड फिल्म इन्डस्ट्रीला एक वेगळीच ओळख मिळवून दिली. यशचा KGF चॅप्टर 2 ता टीजर सर्वत्र धुमाकूळ घालतोय. आतापर्यंत 10 कोटी लोकांनी या टीजरला पाहिलंय.
9/9
KGF या चित्रपटाने त्याला देशभर नाव मिळवून दिलं. या चित्रपटानंतर यशने आपल्या मानधनात वाढ केली. सध्या 'KGF चॅप्टर 2' चा लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. या फिल्मच्या टीजरने विक्रम केला आहे. यशची आजची लोकप्रियता ही कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्यापेक्षा कमी नाही.