एक्स्प्लोर
PHOTO: ‘वीर सावरकर’ चित्रपटातील पहिला लूक; रणदीपचा दुसरा बायोपिक!
(फोटो:randeephooda/ig)
1/7

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज (शनिवार) 139वी जयंती आहे.(फोटो:randeephooda/ig)
2/7

याच दिवसाचे निमित्त साधत निर्माते संदीप सिंग (Sandeep Singh) आणि आनंद पंडित (Anand Pandit), दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी आगामी ‘स्वतंत्र वीर सावरकर’ (Swatantra Veer Savarkar) या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. (फोटो:randeephooda/ig)
3/7

यात अभिनेता रणदीप हुडा (Randeep Hooda) ‘वीर सावरकरां’ची भूमिका साकारत आहे. पोस्टरवर 'हिंदुत्व धर्म नहीं, इतिहास है' असे लिहिले आहे. ऑगस्ट 2022पासून या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे.(फोटो:randeephooda/ig)
4/7

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचे कथानक विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग हे लंडन, महाराष्ट्र, अंदमान आणि निकोबार येथे होणार आहे.(फोटो:randeephooda/ig)
5/7

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडा याचा हा दुसरा बायोपिक असणार आहे. याआधी त्याने ‘सरबजीत’ या बायोपिकमध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. रणदीप हुडा आणि चित्रपट निर्माते संदीप सिंह यांनी यापूर्वी 'सरबजीत' चित्रपटात एकत्र काम केले आहे. (फोटो:randeephooda/ig)
6/7

या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. 'स्वातंत्रवीर सावरकर' या चित्रपटाची निर्मीती संदीप सिंह आणि आनंद पंडित यांनी केली असून, दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. (फोटो:randeephooda/ig)
7/7

'स्वतंत्र वीर सावरकर' चित्रपटाच्या स्क्रिप्टचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या भूमिकेसाठी रणदीप किती मेहनत घेत आहे, याची झलक चित्रपटाच्या फर्स्ट लूकमधून पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्याने भूमिकेसाठी वजन कमी करण्यास सुरुवात केली आहे.(फोटो:randeephooda/ig)
Published at : 28 May 2022 05:30 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























