एक्स्प्लोर
सोशल मीडियावर गाजत आहेत अभिनेत्री ऋतुजा बागवेचे फोटोशूट

(Photo:@rutuja_bagwe/IG)
1/6

मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवेचं फोटोशूट सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहेत. ट्रेडिशनल, इंडो वेस्टर्न तर कधी बोल्ड लूकमधली ऋतुजाने चाहत्यांना मात्र चांगलीच भूरळ घालती आहे.
2/6

ऋतुजा बागवेने महाविद्यालयीन काळात अनेक एकांकिका स्पर्धा गाजवलेल्या आहेत. त्यात तिला अनेकदा उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी पारितोषिकेदेखील मिळाले आहेत.
3/6

अनन्या नाटकातून ऋतुजा मुख्य भूमिकेतून दिसली होती. ती भूमिका साकारण्यासाठी तिला अथक परिश्रम घ्यावे लागले होते. त्या भूमिकेत तिने साकारलेल्या पात्राचे बड्या कलाकारांपासून ते प्रेक्षकांपर्यंत सर्वांनीच कौतुक केले होते.
4/6

नांदा सौख्य भरे, तु माझा सांगाती, चंद्र आहे साक्षिला या मालिकांमधून ऋतुजा घराघरात पोहोचली होती. तर चंद्र आहे साक्षिला मध्ये ती अभिनेता सुबोध भावे सोबत दिसली होती.
5/6

गिरगाव व्हाया दादर या एकांकिकेत ऋतुजा बागवे मुख्य भूमिकेत होती. पुढे या एकांकिकेचे व्यावसायिक नाटकदेखील रंगभूमीवर आले होते. त्यातदेखील ऋतुजा मुख्य भूमिकेत दिसून आली होती.
6/6

ऋतुजा नेहमीच भूमिका निवडताना त्या भूमिकेचा अभ्यास करत असते. तिच्यातील शिकाऊ वृत्ती, अभिनयातला सटलपणा तिच्या कामातून दिसून येत असतो. सध्या तिने फिटनेसकडे प्रचंड लक्ष केंद्रित केले आहे. त्यासंदर्भातले फोटोदेखील ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
Published at : 24 Sep 2021 03:49 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
सोलापूर
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
