एक्स्प्लोर
Advertisement

'या' क्रिकेटरची मुलगी लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; पाहा फोटो!

(photo:saratendulkar/ig)
1/9

सारा सचिन तेंडुलकर या नावातच ग्लॅमर आहे. प्रसिद्धीच्या बाबतीत सारा ही वडील सचिन तेंडुलकरपेक्षा कमी नाही. तर दिसण्याच्या बाबतीत ती अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकेल अशीच आहे.(photo:saratendulkar/ig)
2/9

आता सारा तेंडुलकर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. साराने अभिनयाचे प्रशिक्षणही घेतलं आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. साराने लंडन विद्यापीठात तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे.(photo:saratendulkar/ig)
3/9

24 वर्षीय सारा तेंडुलकरला बॉलिवूडमध्ये करिअर करायचं आहे. काही वर्षांपूर्वी अशी बातमी आली होती की सारा तेंडुलकर शाहिद कपूरसोबतच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करु शकते.(photo:saratendulkar/ig)
4/9

मात्र, त्यावेळी साराचे वडील सचिन तेंडुलकर यांनी या वृत्ताचं खंडन केलं होतं. सचिन तेंडुलकरने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की, सारा अजूनही तिच्या अभ्यासात व्यस्त आहे आणि सध्या तिची चित्रपटांमध्ये दिसण्याची शक्यता नाही."(photo:saratendulkar/ig)
5/9

सारा सोशल मीडियावर फारच सक्रिय असते आणि अनेकदा तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. सारा तेंडुलकरचे इन्स्टाग्रामवरच 1.8 मिलियन फॉलोअर्स आहेत, तर ती फक्त 484 लोकांना फॉलो करते.(photo:saratendulkar/ig)
6/9

सारा फॉलो करणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये शाहरुख खान, रणवीर सिंग, विकी कौशल, आलिया भट्ट आणि अंगद बेदी यांचा समावेश आहे. दरम्यान रणवीर सिंह हा तिचा सर्वात आवडता अभिनेता आहे.(photo:saratendulkar/ig)
7/9

सचिन तेंडुलकरने 24 मे 1995 रोजी अंजली मेहतासोबत लग्न केलं होतं. लग्नाच्या अडीच वर्षानंतर ऑक्टोबर 1997 मध्ये सचिन मुलगी साराचा पिता झाला.(photo:saratendulkar/ig)
8/9

साराचा जन्म 12 ऑक्टोबर 1997 रोजी मुंबईत झाला होता. सचिन त्याच्या कुटुंबासह मुंबईतील वांद्रे येथे राहतो. सारा तिची आई अंजली तेंडुलकरप्रमाणेच खूप सुंदर आहे. सारा तेंडुलकरला चित्रपट पाहायला फार आवडतात.(photo:saratendulkar/ig)
9/9

सारा तेंडुलकरचे नाव अनेकदा आयपीएल खेळाडू शुभमन गिलसोबत जोडलं गेलं आहे. मात्र, दोघांनीही या नात्याबद्दल अद्याप काहीही सांगितलेले नाही.(photo:saratendulkar/ig)
Published at : 26 Apr 2022 03:54 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
