एक्स्प्लोर
Saara Kahi Tichyasathi:निशीच्या लग्नाला उमा आणि ओवीचा शृंगार पहा ! ‘सारं काही तिच्यासाठी’
Saara Kahi Tichyasathi:निशीच्या लग्नाला उमा आणि ओवीचा शृंगार पहा ! ‘सारं काही तिच्यासाठी’ (Photo Credit : instagram/dakshata_joil)

zeemarathi (Photo Credit : instagram/dakshata_joil)
1/10

खोत कुटुंबात लग्न कार्य आहे आणि तयारी एकदम जोरात चालू आहे. उमा आणि रघुनाथच्या लाडक्या लेकीच निशीचं लग्न आहे.(Photo Credit : instagram/dakshata_joil)
2/10

माहेरच्या पिवळ्या रंगाच्या साडीत निशी तयार आहे. निशी म्हणजेच दक्षता जोईल आपल्या ह्या लग्नाच्या लुकबद्दल सांगितले,"निशीच्या लग्नासाठी फक्त खोत परिवारच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र उत्सुक आहे.(Photo Credit : instagram/dakshata_joil)
3/10

मला प्रवासात भेटणारे कार्यक्रमाचे चाहते विचारतायत की निशीच्या लग्नात काय होणार आहे. त्यांची उत्सुकता पाहून आम्हा सगळ्यांना खूप आनंद मिळतो आणि काम करण्याची ऊर्जा देखील वाढते. (Photo Credit : instagram/dakshata_joil)
4/10

निशीच्या लग्नाच्या लुक बद्दल जितकी प्रशंसा करू कमी आहे आमच्या क्रिएटिव्ह टीम आणि स्टायलिंग टीमनी अतिशय सुंदर काम केले आहे.(Photo Credit : instagram/dakshata_joil)
5/10

मराठी मुलीचं लग्न आणि माहेरची पिवळी साडी ठरलेलीच आहे, पण त्यात आम्ही गुलाबी रंगाचे काठ देऊन त्याला एक वेगळा लुक दिला आहे. मेक-अप आणि केस आम्ही एकदम साधे पण सुंदर केले आहे. (Photo Credit : instagram/dakshata_joil)
6/10

मोत्याच्या दागिन्यांनी निशीचा निरागसपणा उठून आणला आहे. कानवेल, बुगड्या हे खूप सांस्कृतिक दृष्टिकोन लक्षात घेऊन निशाला नवरीरूपात तयार केले.(Photo Credit : instagram/dakshata_joil)
7/10

मुलीचं लग्न तर आईचाही थाट तितकाच असतो, मोत्याची नथ आणि गळ्यात सोन्याचा हार आणि हातात हिरवा चुडा घालून उमा निशीच्या लग्नकार्यासाठी तयार झाली आहे.(Photo Credit : instagram/dakshata_joil)
8/10

नवरीची बहीण ओवी ही निशीच्या लग्नासाठी पारंपरिकरीतीने तयार झाली आहे, जांभळ्या आणि लाल रंगाची साडी, मोत्याची नथ आणि दागिने त्यावर नाजूकशी एक टिकली लावून ओवीने लग्नकार्यमध्ये नवरीच्या बहिणीनंसाठी आणि मैत्रिणींसाठी खूप छान इन्स्पिरेशन असू शकत. (Photo Credit : instagram/dakshata_joil)
9/10

तर सर्वानी पाहायला विसरू नका ‘सारं काही तिच्यासाठी’ सोमवार ते शनिवार संध्या. ७.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर. (Photo Credit : instagram/dakshata_joil)
10/10

टीप:वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही (Photo Credit : instagram/dakshata_joil)
Published at : 24 Jan 2024 01:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
मुंबई
गोंदिया
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
