Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 22 Mar 2022 01:44 PM (IST)
Priya Prakash Varrier
1/7
केवळ डोळ्यांनी प्रेक्षकांवर जादू करणाऱ्या मनोरंजन विश्वातील सौंदर्यवतींबद्दल बोलायचं झालं, तर प्रिया प्रकाश वारियरचं नाव अग्रक्रमी येईल. सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे रातोरात प्रसिद्ध झालेल्या प्रिया प्रकाशला वेगळ्या ओळखीची गरज नाही.
2/7
चाहत्यांमध्ये तिची एक वेगळी ओळख आहे. मात्र, आता ती ज्या लूकमध्ये सोशल मीडियावर दिसलीये ते पाहून चाहतेही हैराण झाले आहेत.
3/7
नाकात नथ, केसांचा आंबाडा, हातात बाजूबंद आणि पायात अल्ता... त्यावर आदिवासी शैलीत नेसलेली साडी. प्रिया प्रकाश वारियरचा हा लूक लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
4/7
या फोटोंमध्ये ती ना हसत आहे, ना आनंदी आहे... या फोटोत तिच्या चेहऱ्यावरचा भाव अगदी एखाद्या मूर्तीसारखा आहे.
5/7
त्यामुळेच प्रिया प्रकाशचे हे लेटेस्ट फोटोशूट खूप चर्चेत आहे. तिने हा लूक का केलाय, हे जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता आहे.
6/7
फोटो पाहता असे वाटते की, तिचा लूक एका नवीन प्रोजेक्टसाठी आहे, जो तिने इन्स्टाग्रामवर शेअर करताच व्हायरल झाला आहे.
7/7
2018 मध्ये, एक ‘ब्लिंक’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यात झळकलेली प्रिया रातोरात प्रसिद्ध झाली. (photo : @priya.p.varrier/IG)