एक्स्प्लोर
Palak Tiwari : 'या' कारणामुळे पलक तिवारी पुन्हा ट्रोल..
(photo:palaktiwarii/ig)
1/6

Palak Tiwari : टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची (Shweta Tiwari) लेक पलक तिवारी (Palak Tiwari) चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वीच सतत चर्चेत असते.(photo:palaktiwarii/ig)
2/6

वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी पलक तिवारी सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय झाली. हार्डी संधूच्या 'बिजली' गाण्याच्या म्युझिक व्हिडीओमधून पदार्पण करणारी पलक तिवारी अनेकदा पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होत असते.(photo:palaktiwarii/ig)
3/6

पलक सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. पलक तिवारी अनेकदा तिच्या बोल्ड आणि हॉट स्टाईलने चाहत्यांची मने जिंकते. पण, आता सोशल मीडियावर काही लोक तिला सडपातळपणावरून ट्रोल करत आहेत. मात्र, आता पलक तिवारीने यावर मौन तोडत ट्रोल्सना चोख प्रत्युत्तर दिले आहे.(photo:palaktiwarii/ig)
4/6

सोशल मीडिया सेन्सेशन पलक तिवारीने अलीकडेच बॉलिवूड बबलशी खास संवाद साधताना, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिला ‘स्किनी’ म्हणत आणि ट्रोल केल्याबद्दल तिची प्रतिक्रिया व्यक्त केली.(photo:palaktiwarii/ig)
5/6

पलक तिवारी म्हणाली, 'मला या सर्व गोष्टींची इतकी पर्वा नाही, जितकी लोकांना वाटते की, ती मला असायलाच हवी. कारण, हे लोक कधीच समाधानी होणार नाहीत, हे माझ्या लक्षात आले आहे. त्यांनी स्वतःची मतं आधीच बनवली आहेत.’ पलक तिवारी पुढे म्हणाली, ‘कलाकार कसे दिसतात, कसे राहतात याविषयी चर्चा करणाऱ्या लोकांनी आता गप्प बसावे, कारण त्यांच्या मताने कुणालाही काही फरक पडत नाही. हे लोक स्वतःवरच खुश नाहीत.’(photo:palaktiwarii/ig)
6/6

अलीकडेच, पलक तिवारीने रॅम्प वॉकवर जलवा दाखवला. फॅशन वीकमध्ये ती डिझायनर ईशा अमीनच्या कलेक्शनचे प्रदर्शन करताना दिसली. अनेकांनी तिच्या रॅम्प वॉकचे कौतुक केले. मात्र, काही लोकांनी तिला ट्रोल करत, तिचे चालणे खूप वाईट असल्याचे म्हटले. पलक तिवारी लवकरच विवेक ओबेरॉय आणि अरबाज खानसोबत मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.(photo:palaktiwarii/ig)
Published at : 05 May 2022 11:31 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























