एक्स्प्लोर
PHOTO : मुळशी पॅटर्न फेम अभिनेत्यानं 'या' अभिनेत्रीसोबत बांधली लग्नगाठ
kshitish_date_&_rucha_apte
1/8

मुळशी पॅटर्न फेम अभिनेता क्षितीज दाते आणि अभिनेत्री ऋचा आपटे यांनी आपली लग्नगाठ बांधली आहे.
2/8

काही दिवसांपूर्वी क्षितीज आणि ऋचा यांचा साखरपुडा सोहळा पार पडला होता.
3/8

साखरपुडा सोहळ्यानंतर दोघांनी आपलं लग्नही उरकून घेतलं आहे.
4/8

ऋचा आणि क्षितीक्षने त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन आपल्या लग्नाबाबतची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.
5/8

सिनेसृष्टीतील त्यांच्या काही जवळच्या मित्र-मैत्रिणींनी त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
6/8

दोघांनीही आपल्या अकाउंटवर फोटो शेअर न करता केवळ स्टोरीवरुन ही माहिती चाहत्यांना दिली आहे.
7/8

'मुळशी पॅटर्न' चित्रपटात क्षितीज दाते दिसून आला होता, तर 'दिल दोस्ती दुनियादारी', 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकांमधून ऋचा झळकली होती.
8/8

ऋचा आणि क्षितिज 'बन मस्का' या मालिकेतून एकत्रित काम करत होते. याच मालिकेच्या सेटवर या दोघांची खूप चांगली मैत्री झाली आणि त्या मैत्रिचे रुपांतर प्रेमात झालं.
Published at : 26 Apr 2021 12:43 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























