एक्स्प्लोर
PHOTO: जाणून घेऊया कॉन्ट्रोवर्सी क्वीन राखीच्या लव्हलाईफ बद्दल!
,RAKHI SAWANT
1/10

बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) आज आपला 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. राखी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
2/10

'ड्रामा क्वीन' म्हणून लोकप्रिय असलेली राखी कधी कोणत्या कारणाने चर्चेत येईल हे सांगता येणार नाही. राखी सावंतचं दोनदा लग्न मोडलं आहे. तसेच प्रेमासाठी तिने धर्मही बदलला. पण तरीही आज वयाच्या 45 व्या वर्षी ती सिंगल आयुष्य जगत आहे.
3/10

राखी सावंतने वैयक्तिक आयुष्यात काही चांगलं काम केलेलं नाही. कधी 'बिग बॉस' (Bigg Boss) तर कधी म्युझिक व्हिडीओमुळे ती चर्चेत असते. पण गेल्या काही दिवसांपासून ती वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
4/10

राखी सावंतने रितेशसोबत गपचुप लग्न केलं होतं. पण नंतर काही कारणाने हे लग्न मोडलं. राखीने 'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) या कार्यक्रमाच्या माध्यमातून रितेशची जगाला ओळख करून दिली होती.
5/10

. राखीआधी रितेशचं लग्न झालं होतं. तसेच त्याला मुलंदेखील होती. पण 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडताना राखी आणि रितेश वेगळे झाले होते. दोघांनी एकमेकांवर अनेक आरोप केले होते.
6/10

रितेशसोबतचं नातं तोडल्यानंतर राखी आदिल खान दुर्रानीला (Adil Khan Durrani) डेट करायला लागली. सोशल मीडियावर निकाहचे फोटो शेअर करत तिने चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली होती. आदिल खान दुर्रानीसाठी राखीने धर्मदेखील बदलला होता.
7/10

तिने राखी ऐवजी तिचं नाव फातिमा असं ठेवलं होतं. पण राखी आणि आदिलचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
8/10

राखी सावंतला ड्रामा क्वीनसह कॉन्ट्रोवर्सी क्वीनदेखील म्हटले जाते. राखीने 'अग्निचक्र' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'जोरू का गुलाम', 'जिस देश में गंगा रहा है' अशा अनेक सिनेमांत राखीने छोट्या-मोठ्या भूमिका केल्या आहेत.
9/10

पण 2005 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'परदेसिया' या गाण्याने राखी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. या गाण्यामुळे राखी 'आयटम गर्ल' म्हणून ओळखली जाऊ लागली. राखीने आजवर अनेक रिअॅलिटी शो केले आहेत.
10/10

राखीने 2009 साली 'राखी का स्वयंवर' नावाचा एक खास रिअॅलिटी शो केला होता. आपल्या मेहनतीच्या जोरावर राखी आज कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे. राखीने हिंदीसह, कन्नड, मराठी, तेलुगू आणि तामिळ सिनेमांतदेखील आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे.
Published at : 25 Nov 2023 02:28 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















