एक्स्प्लोर
शाहरुख खानहून जास्त व्यस्त त्याचा मुलगा आर्यन, आई गौरी खानकडून पोलखोल; पाहा...
शाहरुख खान हा बी-टाउनचा असा सुपरस्टार आहे ज्याचे केवळ भारतातच नाही, तर परदेशातही प्रचंड चाहते आहेत. अशात तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की शाहरुख खानपेक्षा जास्त व्यस्त त्याचा मुलगा आर्यन खान असतो.
ShahRukh Khan with his son Aryan Khan
1/7

अभिनेता शाहरुख खान पत्नी गौरी खानच्या 'माय लाइफ इन अ डिझाईन' या पुस्तकाच्या लॉन्च इव्हेंटमध्ये उपस्थित होता.
2/7

यादरम्यान अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान या दोघांनीही मुलांच्या आयुष्याविषयी बोलताना अनेक मोठे खुलासे केले.
3/7

तिचा मोठा मुलगा आर्यन खानबद्दल बोलताना गौरी खान म्हणाली, शाहरुख खूप बिझी आहे पण तरीही त्याची डेट आम्हाला मिळते, पण आर्यन खानची डेट मिळणं आणि त्याची वेळ मिळणं खूप अवघड काम आहे.
4/7

खरं तर, सध्या आर्यन खान त्याच्या डेब्यू वेब सीरिजच्या दिग्दर्शनात व्यस्त आहे.
5/7

रिपोर्ट्सनुसार, आर्यन खानची 'स्टारडम' नावाची वेब सिरीज येत आहे. आर्यनचे वडील म्हणजेच शाहरुख खान स्वतः या वेब सिरीजमध्ये अभिनय करताना दिसणार आहेत.
6/7

यासोबतच आर्यनने काही दिवसांपूर्वी स्वतःचा क्लोदिंग ब्रँड D'YAVOL देखील लॉन्च केला आहे. ही माहिती एका जाहिरातीद्वारे देण्यात आली ज्यामध्ये आर्यन आणि शाहरुख दोघेही दिसत होते.
7/7

पुस्तक प्रकाशन सोहळ्याबद्दल बोलायचे झालेच, तर यात शाहरुख खान आणि गौरी खान यांनी मॅचिंग कपडे घातले होते. काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दोघेही अप्रतिम दिसत होते.
Published at : 16 May 2023 11:37 PM (IST)
आणखी पाहा























