एक्स्प्लोर
Bollywood Kissa: शाहरुखची चेष्टा करताना राणी मुखर्जीवर भडकले तिचे सासरे यश चोप्रा, वीर झाराच्या सेटवरचा 'तो' रंजक किस्सा
Rani Mukerji Kissa: जेव्हा 'वीर झारा' या चित्रपटाच्या सेटवर बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीबाबत एक रंजक किस्सा घडला होता.
Rani Mukerji Kissa
1/10

'राजा की आयेगी बारात' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केलेल्या राणी मुखर्जीने अनेक वर्षे इंडस्ट्रीवर राज्य केले आहे.
2/10

आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत राणीने 'कुछ कुछ होता है', 'हम तुम', 'चलते चलते', 'वीर जरा' आणि 'मर्दानी' असे अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
3/10

पण चतुरस्त्र अभिनेत्री राणी मुखर्जीचा 'वीर झारा' चित्रपटाच्या शूटिंगवेळी असाच एक किस्सा घडला होता. तो ऐकून कुणालाही हसू आवरणार नाही.
4/10

राणी मुखर्जीने अभिनेता शाहरुख खान आणि प्रिती झिंटासोबत वीर झारामध्ये काम केले होते. या चित्रपटात प्रेमकथा दाखवण्यात आली होती.
5/10

या चित्रपटात राणी एका वकिलाच्या भूमिकेत होती. वर्षानुवर्षे पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत पडलेल्या शाहरुखची सुटका व्हावी म्हणून त्याची केस ती लढवते.
6/10

राणी मुखर्जीने चित्रपटात प्रवेश केला तेव्हा शाहरुख खान बराच म्हातारा दाखवला जाणार होता. अशा परिस्थितीत त्याचा मेकअप करून त्याचे केस पांढरे करण्यात आले.
7/10

त्याआधीच्या अनेक चित्रपटात राणी आणि शाहरुखने रोमान्स केला होता. अशा परिस्थितीत राणी मुखर्जीने शाहरुखला वयस्कर व्यक्तीच्या भूमिकेत पाहिले आणि तिने वारंवार त्याची चेष्टा सुरू केली.
8/10

जेव्हा राणीने ही गोष्ट सातत्याने केली तेव्हा यश चोप्रांना ते सहन झाले नाही आणि त्यांनी राणीला फटकारले.
9/10

खुद्द राणी मुखर्जीने ही गोष्ट शेअर केली होती. जेव्हा ती तिच्या एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचली होती.
10/10

यश चोप्रा हे राणी मुखर्जीचे सासरे होते. राणीने यश चोप्रा यांचा मुलगा आदित्य चोप्रासोबत लग्न केले आहे.
Published at : 28 Nov 2023 12:02 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
व्यापार-उद्योग
राजकारण
क्राईम























