एक्स्प्लोर
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात फुटतायत प्रेमाचे धुमारे, निक्की-अरबाझ यांच्यात नेमकं काय घडतंय?
'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनची थाटात सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस मराठी'च्या घरात प्रेमाचे धूमारे फुटू लागले आहेत. बिग बॉसच्या घरात जोडी जमणे ही फारशी नवीन बाब नाही.

'बिग बॉस मराठी'च्या या सीझनमध्ये निक्की आणि अरबाजची जोडी जमणार का? याकडे 'बिग बॉस' प्रेमींचं लक्ष लागलं आहे.
1/7

'बिग बॉस मराठी'च्या ग्रॅड प्रीमियरलाच अभिनेत्री निक्की तांबोळी अभिनेता रितेश देशमुखसमोरच स्प्लिट्सविला या रिअॅलिटी शोममुळे प्रसिद्ध झालेल्या अरबाज पटेलवर फिदा झालेली दिसून आली. ( P.C nikki_tamboli )
2/7

'बिग बॉस'च्या घरात दुसऱ्या दिवशी छोटा पुढारी अर्थात घनश्याम दरवडे निक्की आणि अरबाज यांच्या नातेसंबंधावर भाष्य करताना दिसून आला आहे. ( P.C nikki_tamboli )
3/7

'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या दिवसाच्या प्रोमो समोर आला असून दुसऱ्याच दिवशी निक्की तांबोळी चहा बनवायला घेते. पण हीटर चालत नसल्याने ती छोटा पुढारीला बिग बॉसला विनंती करण्यास सांगते. ( P.C nikki_tamboli )
4/7

छोटा पुढारी 'बिग बॉस'ला म्हणतो आमच्या वहिनींचं तरी ऐका. विशेष म्हणजे छोटा पुढारीला यावर उत्तर दिले आहे. थांबरे सकाळी सकाळी असं काय म्हणतोस, असे अरबाज म्हणताना दिसतोय. ( P.C mr.arbazpatel )
5/7

"तुझं प्रेम उतू चाललंय ते सांगतोय.. चहा उतू गेला तर काही बिघडत नाही", असे छोटा पुढारी बिग बॉसच्या प्रोमोमध्ये म्हणताना दिसतोय. छोटा पुढारीच्या या विधानानंतर अरबाज आणि निक्कीला हसू अनावर होत असल्याचं प्रोमोमध्ये दिसतंय. ( P.C mr.arbazpatel )
6/7

'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड प्रीमियरला निक्की तांबोळी अरबाजकडे पाहून लाजताना दिसली होती. अरबाजला पाहून सगळंच विसरली असल्याचं ती म्हणाली होती. ( P.C nikki_tamboli )
7/7

अरबाजही निक्कीला म्हणाला होता की तुला सगळीकडे मीच दिसेन. माझ्याशिवाय तुला दुसरं काही सुचणार नाही. त्यामुळे आता 'बिग बॉस मराठी'च्या या सीझनमध्ये निक्की आणि अरबाजची जोडी जमणार का? याकडे 'बिग बॉस' प्रेमींचं लक्ष लागलं आहे. ( P.C mr.arbazpatel )
Published at : 30 Jul 2024 01:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
