एक्स्प्लोर
TDM Movie : 'टीडीएम'ला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात ट्रॅक्टर मोर्चा; 'मराठीची गळचेपी दूर झालीच पाहिजे' म्हणत शेतकरी बांधवानी केला सपोर्ट
Pune : 'टीडीएम' चित्रपटाच्या समर्थनार्थ काल छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड, शिरूर येथे सर्व शेतकरी बांधवांनी ट्रॅक्टर मोर्चा काढत यांत सहभाग दर्शविला.

TDM
1/10

'टीडीएम' या सिनेमाला चित्रपटगृहात शो नसल्या कारणास्तव यावर चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार मंडळींनी भाष्य करत न्याय मागितला.
2/10

प्रेक्षकांनीदेखील 'हा चित्रपट पाहायचा आहे' असे नारे लगावण्यास सुरुवात केली आहे.
3/10

'टीडीएम' चित्रपटाच्या समर्थनार्थ काल छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड, शिरूर येथे सर्व शेतकरी बांधवांनी ट्रॅक्टर मोर्चा काढत यांत सहभाग दर्शविला.
4/10

'मराठीची गळचेपी दूर झालीच पाहिजे', ''टीडीएम'ला प्राईमटाईम शो मिळालेच पाहिजे','मला 'टीडीएम' पाहायचाय मुंबई - पुण्यात कुठेच नाही' असे नारे लगावत भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढला होता.
5/10

खेड्यापाड्यातून स्वमेहनतीने स्वतःच स्थान निर्माण करणाऱ्या या 'टीडीएम' चित्रपटाच्या संपूर्ण टीममागे आज शेतकरी बांधव उभा आहे, ही वाखाणण्याजोगी बाब आहे.
6/10

पुणे शहरात टीडीएम चित्रपटाला फक्त २२ थेटर मिळाले होते, तसेच प्राईम टाईम शो न मिळणे हा चित्रपटावर झालेला अन्याय पाहता या चित्रपटाचे चित्रपटगृहातील प्रदर्शन चित्रपटाचे निर्माते भाऊराव कऱ्हाडे यांनी स्वतः रद्द केले होते.
7/10

भाऊराव कऱ्हाडे यांच्या 'टीडीएम' या सिनेमाला शो मिळत नसल्याने कलाकारांना अश्रू अनावर झाले होते.
8/10

मराठी सिनेमा संपवला जात आहे. आता या पुढे सिनेमा करण्याची माझी इच्छा नाही, अशी खंत या सिनेमाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी व्यक्त केली होती.
9/10

'टीडीएम' हा सिनेमा 28 एप्रिल 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता.
10/10

माझ्या सिनेमाला तुम्हीच न्याय मिळवून द्या, अशी हात जोडत अभिनेत्याने प्रेक्षकांना विनंती केली होती.
Published at : 08 May 2023 11:46 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
