एक्स्प्लोर
PHOTO: गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजेची लाली... पाहा पाठकबाईंच्या मेहेंदीसोहळ्याचे खास क्षण!
हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

Akshaya Deodhar
1/10

तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधर (Akshaya Deodhar) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
2/10

गेल्या काही दिवसांत त्याच्या लगीनघाईचे फोटो समोर येत होते. त्यामुळे चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली होती.
3/10

हार्दिक आणि अक्षयाच्या मेहंदी सोहळ्यातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
4/10

या मेहेंदी सोहळ्यात अक्षया फारच सुंदर दिसत आहे. कलरफुल लेहेंगा परिधान करून तिने फोटोशूट केलं आहे.
5/10

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर येत्या 1 किंवा 2 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
6/10

तसेच त्यांचे लग्न पुण्यात होणार असल्याचेदेखील म्हटले जात आहे.
7/10

हार्दिक आणि अक्षयाने 3 मे 2022 रोजी दणक्यात साखरपुडा उरकला आणि तेव्हापासून चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली होती.
8/10

अत्यंत पारंपरिक पद्धतीने ते लग्न करणार आहेत. मनोरंजनसृष्टीतील अनेक मंडळींच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे.
9/10

शरीराने दणकट असलेला परंतु मनाने साधा भोळा असणारा पहिलवान राणा आणि गावातील शाळेत शिक्षिका असलेल्या अंजली बाईंची प्रेमकथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत होती.
10/10

आता वैयक्तिक आयुष्यात ते सार फेरे घेणार असल्याने चाहते आनंदीत झाले आहेत. सोशल मीडियावर त्यांचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
Published at : 01 Dec 2022 04:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
