‘नॅशनल क्रश’ ठरलेली अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Madanna) सध्या प्रचंड चर्चेत आहे. नुकतीच अभिनेत्री ‘पुष्पा’ या चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुनसोबत झळकली आहे.(photo:rashmika_mandanna/ig)
2/6
या चित्रपटातील रश्मिकाच्या कामाचे प्रेक्षकांनी देखील तोंडभरून कौतुक केले आहे. ‘पुष्पा’ या चित्रपटाच्या लोकप्रियतेमुळे रश्मिकाचे मानधन वधारले आहे. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये रश्मिका मंदनाच्या नावाचा समावेश झाला आहे. मात्र, रश्मिकाने अनेक सुपर हिट चित्रपट नाकारल्यामुळे, ते नव्या संधींना मुकली देखील आहे.(photo:rashmika_mandanna/ig)
3/6
‘पुष्पा’ या चित्रपटासाठी रश्मिका तब्बल 3 कोटी रुपये मानधन म्हणून आकारले आहेत. मात्र, आता रश्मिका चर्चेत आलीये ते शाहिद कपूरच्या ‘जर्सी’ चित्रपटामुळे..(photo:rashmika_mandanna/ig)
4/6
नुकताच शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर यांचा ‘जर्सी’ हा चित्रपट रिलीज झाला. हा चित्रपट सुपर हिट ठरला आहे. या चित्रपटात अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या भूमिकेसाठी आधी रश्मिकाला विचारणा करण्यात आली होती. मात्र, रश्मिकाने हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. शाहिद कपूरचा ‘जर्सी’ हा चित्रपट दक्षिणात्य ‘जर्सी’ या चित्रपटाचा रिमेक होता.(photo:rashmika_mandanna/ig)
5/6
रश्मिका मंदानाने चित्रपटाला नाही म्हणण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही या अभिनेत्रीने दिग्दर्शक शंकरचा चित्रपट 'RC15' हा चित्रपट नाकारला आहे. रश्मिकाच्या नकारानंतर या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणीला कास्ट करण्यात आले.(photo:rashmika_mandanna/ig)
6/6
इतकेच नाही तर, रश्मिकाने प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा एक आगामी चित्रपट देखील नाकारला आहे. संजय लीला भन्साळी यांच्या या आगामी चित्रपट अभिनेता रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत झळकणार आहे.(photo:rashmika_mandanna/ig)