एक्स्प्लोर

Ashok Saraf On Sachin Pilgaonkar: 'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'

प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. या ट्यूनिंमुळे धूमधडाका चित्रपट 50 आठवडे चालल्याचं त्यांनी म्हटलं. 

Ashok Saraf on Sachin Pilgaonkar:  मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या टाइमिंगने प्रेक्षकांची हसून पुरेवाट लावणारे दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी अनेक गाजलेले सिनेमे दिले. अनेक दिग्गजांसोबत काम केलं. पण काही जोड्या ह्या कायम प्रेक्षकांमध्ये आवर्जून चर्चेत असतात. त्यातलीच एक जोडी म्हणजे 'सचिन आणि अशोक'. अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांच्यासोबत अनेक हिट चित्रपट दिले. अलीकडेच नागपूर येथे महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री अशोक सराफ यांच्या 80व्या वर्षात पदार्पण निमित्ताने एक जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भरभरून गप्पा मारल्या.सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना सराफ म्हणाले, 'त्याला पाहिजे ते मी करतो, किंवा मी जे करतो ते त्याला समजत होतं. आमचं टाइमिंग जुळलं, आणि प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. या ट्यूनिंमुळे धूमधडाका चित्रपट 50 आठवडे चालल्याचं त्यांनी म्हटलं. 

अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांनी 'अशी ही बनवाबनवी', 'मायबाप','आत्मविश्वास', 'गंमत जंमत', 'नवरा माझा नवसाचा ', 'आयडियाची कल्पना', 'माझा पती करोडपती',' नवरी मिळे नवऱ्याला', 'आम्ही सातपुते ', 'आमच्यासारखे आम्हीच ' असे अनेक हिट सिनेमे दिले.

'त्याला जे पाहिजे ते मी करतो.. ' 

सचिन पिळगावकर यांच्याबद्दल बोलताना अशोक सराफ म्हणाले, "त्याला पाहिजे ते मी करतो. किंवा मी करतो त्याला समजत होतं. हे एकमेकाला समजत गेले. लक्ष्मीकांत बेर्डे आणि मी 50 चित्रपट केली. याला टायमिंग जुळल होतं. म्हणून लोकांनी डोक्यावर घेतल्याचे सराफ म्हणाले. तेंव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली. आमच्याआधी पण सुपरस्टार होते. मात्र, त्याकाळात सुपरस्टार म्हणत नव्हते. महेश कोठारे क्राइम आणि अद्भुत कवठ्या महाकाल असे असायचे. सचिनकडे कौटुंबिक असायचे. धूमधडाका चित्रपट 50 आठवडे चालल्याचे सराफ म्हणाले. 

चित्रपटात कथा महत्वाची असते..

 कोल्हापुरात सिनेमाचं वारं वेगळं असायचं. एकावेळी दहा चित्रपटाच शूट व्हायचे. मी एकाच वेळी तीन चित्रपटाचे शूट करायचो. त्यावेळी लेखक देखील चांगले होते. घटना आणि त्याला अनुसरून डायलॉग असायला हवं तेव्हा सर्व हिट होते. चित्रपटात कितीही सजावट करा, लंडन आणि अमेरिकेत शुटिंग करा. त्यामध्ये कथा महत्वाची असते. कुठे गेले यापेक्षा काय केले हे महत्वाचे असल्याचे सराफ म्हणाले.

माझ्याआधीदेखील अनेक चांगले कॉमेडियन 

अभिनय अभिनय क्षेत्रात बघणे आवश्यक, वाचनातून भाषा सुधारू शकता असेही ते म्हणाले. माझ्याआधी देखील चांगले कॉमेडियन होते. त्याचा एक जमाना होता . मराठी चित्रपटसृष्टी यांच्याविना मान्य व्हायची नाही. सहज अभिनय करणे. वाक्य कसे टाकून प्रेषक आपल्याकडे करायचं हे त्यांना माहित असायचं. मराठी चित्रपटाचा एक काळ होता तो राजा गोस्वामी वीणा बनायचं नाही असेही ते म्हणाले.  

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf On Sachin Pilgaonkar: 'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'
'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Advertisement

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Embed widget