एक्स्प्लोर
Disha Salian Death Case: सतीश सालियन यांनी त्या महिलेला 3000 रुपये पाठवले; दिशाने व्हॉट्सॲपवर सर्व वाचले, प्रश्न विचारताच वाद अन्...
Disha Salian Death Case: एसआयटीला चौकशीदरम्यान दिशा सालियनच्या लॅपटॉपमध्ये डेटा मिळाला होता.
Disha Salian Death Case
1/8

Disha Salian Death Case: दिशा सालियनच्या लॅपटॉपमध्ये वडील सतीश सालियन यांचा व्हॉटस्अॅप डेटा मिळाला.
2/8

आधीच्या एसआयटीला चौकशीदरम्यान दिशा सालियनच्या लॅपटॉपमध्ये डेटा मिळाला होता.
3/8

वडिलांना न सांगता दिशाने वडिलांच्या व्हॉट्सअॅपचं अॅक्सेस लॅपटॉपमध्ये घेतलं होतं. दिशा वडिलांची चॅट नेहमी वाचत होती.
4/8

दिशाचे वडील सतीश सालियन यांचे एखाद्या महिलेशी संबंध असल्याचा दिशाला संशय होता. आपलं व्हॉट्सअॅप दिशाही बघतेय याची वडिलांना माहिती नव्हती.
5/8

दिशाच्या लक्षात आले की, तिच्या वडिलांनी एका महिलेला 3000 रुपये पाठवले आणि तेही तिला न सांगता. वडिलांनी हे पैसे पाठवल्याने तिला खूप वाईट वाटले.
6/8

दिशाने त्या महिलेला पैसे का पाठवले असा जाब विचारताच वडिलांसोबत तिचा वाद झाला.
7/8

वडिलांसोबत वाद झाल्यनंतर घर सोडून मालाड मालवणीला गेल्याचं दिशानं मित्रांना सांगितलं होतं.
8/8

दिशाच्या मित्रांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलं त्यावेळी त्यामध्ये उल्लेख होता की, दिशाने मित्रांना सांगितलं होतं की, दिशाच्या वडिलांनी एका महिलेला पैसे पाठवले होते. मात्र, सतीश सालियान यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला तेव्हा त्यावेळी पोलिसांना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं ती महिला त्यांच्या मित्राची पत्नी आहे आणि तिला पैशाची गरज होती, म्हणून पैसे दिले होते. यामागे चुकीचा विचार नव्हता, यामागे कोणत्याही चुकीच्या प्रकारचा हेतू नव्हता. पण दिशाच्या लॅपटॉपमध्ये वडील सतीश सालियानं यांचा व्हाट्सएप डेटा मिळाल्याची माहिती समोर आली आहे. पुरावे आणि डेटा हा चौकशीचा भाग आहे. मात्र, यामुळे दिशा देखील डिस्टर्ब असल्याचा दावा पूर्वीच्या एसआयटीने केला होता.
Published at : 03 Apr 2025 12:39 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















