एक्स्प्लोर
ITR : आता फक्त 15 दिवसांचा वेळ उरलाय, जाणून घ्या किती लोकांनी भरलाय ITR , अंतिम तारखेनंतर भरावा लागेल इतका दंड!
जरी तुम्ही कराच्या कक्षेत येत नसाल, तरीही तुम्ही आयटीआर भरला पाहिजे.

(photo:unsplash.com)
1/9

आर्थिक वर्ष 2022-23 आणि मूल्यांकन वर्ष 2023-24 (Assessment Year) साठी ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे.
2/9

विभागानं आयटीआर भरण्यासाठी ऑनलाईन फॉर्म (Online Form) जारी केला आहे. अशा परिस्थितीत 31 जुलैपर्यंत वेळ आहे, असं समजून आयटीआर दाखल करण्यास अजिबात उशीर करू नका.
3/9

आयटीआर भरताना, लक्षात ठेवा की, यावेळी नवी कर प्रणाली डिफॉल्टमध्ये ठेवण्यात आली आहे. जर तुम्हाला जुन्या कर प्रणाली अंतर्गत आयटीआर फाईल करायचा असेल, तर तुम्हाला तो पर्याय स्वतःच निवडावा लागेल.
4/9

नव्या कर प्रणालीमध्ये कर सूट मिळविण्यासाठी खूप मर्यादित पर्याय आहेत. दरम्यान, 7 लाखांपर्यंतचं उत्पन्न प्रभावीपणे करमुक्त करण्यात आलं आहे. तसेच, जुन्या कर प्रणालीमध्ये कर सूट मर्यादा वाढविण्यात आलेली नाही.
5/9

परंतु तिथे तुम्ही विविध सरकारी योजनांमध्ये आणि इतर मार्गांनी गुंतवणूक करून कर सवलतीचा दावा करू शकता.
6/9

प्राप्तिकर विभागाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, यावर्षी आतापर्यंत 22 दशलक्ष (2.2 कोटी) करदात्यांनी आयटीआर दाखल केला आहे.
7/9

आयकर विभागाने ठरवून दिलेली अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत करदात्याला आयटीआर भरता आला नाही, तर नंतर त्याला दंड भरावा लागेल.
8/9

या अंतर्गत, 5 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना 1,000 रुपये, तर 5 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना 5,000 रुपये दंड आकारला जातो.
9/9

आयकर विभागाच्या ट्विटद्वारे करदात्यांना सूचित करण्यात आले आहे की ज्यांनी मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी आयटीआर भरला नाही त्यांनी शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी हे काम लवकरात लवकर करावे. (all photo credit:unsplash.com)
Published at : 15 Jul 2023 12:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
विश्व
नागपूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion