एक्स्प्लोर
Mumbai Share Market : मुंबई शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मार्केटची विक्रमी घौडदौड!
संपादित फोटो
1/6

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने आज तब्बल 60 हजार पॉईंट्सची ऐतिहासिक पातळी सर केली. सेन्सेक्सच्या या घोडदौडीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये मोठा उत्साह आहे. सकाळपासूनच आज बाजारात उत्साहाचं वातारण होतं. आज दिवसभरात सेन्सेक्समध्ये 163 अंकाची भर पडली. बाजारातील आजच्या दिवसाचं ट्रेंडिग संपलं तेव्हा सेन्सेक्स 60,048 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांत निफ्टीला मात्र 18 हजाराचा विक्रमी पातळी गाठता आली नाही. आज दिवसअखेर निफ्टी 17,853 पॉईंट्सवर बंद झाला.
2/6

दिवसभरातल्या ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्सने 448 पॉईंट्सची उसळी घेत 60333 ची उच्चांकी पातळी गाठली होती तर निफ्टीने 17947 ने पातळी गाठली.. दुपारच्या सत्रानंतर सेन्सेक्समध्ये चढउतार कायम होते. सेन्सेक्सने आज दिवसभरात गाठलेली पातळी आजवरची सर्वोच्च आहे.
Published at : 25 Sep 2021 12:17 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई






















