एक्स्प्लोर
Shardiya Navratri 2025 : नवरात्रीत घरातील 'या' महत्त्वाच्या वस्तू रिकाम्या ठेवू नका
Shardiya Navratri 2025 : सध्या नवरात्रोत्सवाचा सण सुरु आहे. या काळात बाजारात सगळीकडे आपल्या सणासुदीची रेलचेल पाहायला मिळतेय.
Shardiya Navratri 2025
1/8

वास्तुशास्त्रानुसार, नवरात्रीचा काळ फार शुभ मानला जातो. या काळात काही गोष्टी घरात कधीच रिकाम्या ठेवू नयेत, अन्यथा घरातील सुख-शांती, धन-समृद्धीवर परिणाम होतो अशी मान्यता आहे.
2/8

घरातील पाण्याची घागर, माठ किंवा टाकी कधीच रिकामी ठेवू नये पाणी भरलेले असणे म्हणजे समृद्धी व सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.
3/8

तांदूळ, गहू, डाळी यांचे भांडे कधीही रिकामे ठेवू नये, कारण धान्य भरून ठेवणे म्हणजे घरात लक्ष्मीचा वास होणे.
4/8

नवरात्रातील पूजेत ठेवलेला कलश कधीही रिकामा ठेवू नये आणि पूजेतला दिवा शक्य तितका सतत प्रज्वलित ठेवण्याचा प्रयत्न करावा.
5/8

घरातील तिजोरी कधीही पूर्ण रिकामी ठेवू नये, त्यात थोडेफार नाणे, तांदूळ किंवा तुळशीपत्र ठेवावे.
6/8

घरातील देवघरात दिवा, पाणी, फुले आणि अक्षत नेहमी ठेवावेत, कारण देवघर रिकामे ठेवणे अशुभ मानले जाते.
7/8

स्वयंपाकघर कधीही ओसाड किंवा रिकामे ठेवू नये आणि दिवसातून एकदा गोड किंवा तुपकट पदार्थ शिजवून देवीला नैवेद्य दाखवावा.
8/8

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 25 Sep 2025 03:33 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























