एक्स्प्लोर
US violence | साश्रू नयनांनी अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईडला अखेरचा निरोप, आईच्या कबरीशेजारी दफन

1/8

अमेरिकेत सध्या सुरु असलेला हिंसाचार मागील अनेक दशकांपासूनचा सर्वात मोठा हिंसाचार मानला जात आहे. जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर हा हिंसाचार अमेरिकेतील कमीत कमी 140 शहरांपर्यंत पसरला आहे.
2/8

जॉर्ज यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेसह जगभरातील अनेक शहरांमध्ये हिंसाचार उसळला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि आता हा हिंसाचार यांमुळे अमेरिकेतील वातावरण अशांत झालं आहे.
3/8

दरम्यान, गेल्या महिन्यात मिनियापोलिस शहरात पोलीस कोठडीत जॉर्ज फ्लॉईड यांचा मृत्यू झाला होता. यासंदर्भातील एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये एक पोलीस अधिकारी जॉर्ज यांच्या मानेवर जवळपास 9 मिनिटांपर्यंत आपला गुडघा ठेवून होता. त्यावेळी जॉर्ज अनेकदा ते श्वास घेऊ शकत नसल्याचंही सांगत होते.
4/8

जॉर्ज फ्लॉईड यांना निरोप देण्यासाठी एकत्र आलेले सर्व लोक कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं पाहायला मिळालं.
5/8

आपल्या भावाला निरोप देताना जॉर्ज यांच्या बहिणी सा सा फ्लॉईड आणि ला तोनया फ्लॉयड यांचेही डोळे पाणावले होते. यादरम्यान, रॉक्सी वॉशिंग्टन जॉर्ज फ्लॉईड यांच्या लहान मुलीला आधार देताना दिसून आल्या.
6/8

जॉर्ज फ्लॉईड यांना निरोप देताना सर्वांचेच डोळे पाणावले होते. त्यांचे कुटुंबिय देखील शोक व्यक्त करत होते.
7/8

खास गोष्ट म्हणजे, अंतिम संस्काराआधी जॉर्ज फ्लाईड यांच्या सन्मानार्थ 8 मिनिटं 46 सेकंदांसाठी मौन बाळगण्यात आलं. खरं तर पोलीस अधिकाऱ्याने जॉर्ज यांची मान 8 मिनिटं 46 सेकंदांसाठी गुडघ्याखाली दाबून ठेवली होती. ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. म्हणून त्यांना 8 मिनिटं 46 सेकंदांसाठी मौन बाळगत श्रद्धांजली वाहण्यात आली.
8/8

अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर हिंसाचाराला सुरुवात झाली. अमेरिकेतील ह्यूस्टन शहरात जॉर्ज फ्लॉईड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जॉर्ज फ्लॉईड यांना त्यांच्या आईच्या शेजारीच दफन करण्यात आलं. फ्लॉईड यांच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम शहरातील फाउंटेन ऑफ प्रेस चर्चमध्ये ठेवण्यात आला होता. येथे जवळपास 500 लोक हजर होते. यादरम्यान, अनेक मोठे राजनेते आणि सेलिब्रिटींनीही हजेरी लावत जॉर्ज यांना श्रद्धांजली वाहिली.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
