एक्स्प्लोर
नंदुरबारमध्ये केळीच्या दरात वाढ
agriculture News
1/9

सध्या केळीच्या दरात चांगली वाढ (Banana Price) होत आहे. त्यामुळं केळी उत्पादक शेतकऱ्यांना (Banana Farmers) दिलासा मिळाला आहे.
2/9

उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जात असते. नंदूरबार जिल्ह्यात मार्च-एप्रिल महिन्यात होणाऱ्या लागवडीसाठी आतापासूनच केळीच्या रोपांची बुकिंग शेतकऱ्यांनी सुरु केली आहे.
3/9

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत केळीला मोठी मागणी वाढली आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून केळीच्या दरांमध्ये चांगली वाढ झाली आहे. पिल बागेला 1 हजार 400 ते 1 हजार 700 रुपयापर्यंतचा दर मिळत आहे
4/9

शेतकऱ्यांनी केळीच्या रोपांची बुकिंग सुरू केली असून केळीची रोपे वेळेवर मिळावीत अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मागील वर्षी चार महिन्यापूर्वी केळीचे रोप बुक करुन ती वेळेवर न मिळाल्यानं शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते.
5/9

डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून केळीला मिळणारा चांगला दर हा वर्षभर कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
6/9

केळीच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. लागवडीसाठी केळीच्या रोपांची बुकिंगही सुरू झाली आहे, नर्सरी चालकांनीही शेतकऱ्यांना वेळेत रोप उपलब्ध करून द्यावी हीच अपेक्षा असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.
7/9

मागच्या दोन ते तीन वर्षात केळीला चांगला दर नव्हता. मात्र, यावर्षी केळीच्या दरात चांगली वाढ झाल्याची माहिती केळी उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे.
8/9

केळीला दर मिळत असल्यानं शेतकरी आनंदी आहेत. नवीन केळीच्या सागवडीसाठी शेतकऱ्यांची बुकींग सुरु आहे.
9/9

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत केळीला मोठी मागणी वाढली आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून केळीच्या दरांमध्ये चांगली वाढ झाली आहे.
Published at : 04 Feb 2023 01:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
सातारा
राजकारण
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
