एक्स्प्लोर
wheat : हवामानातील बदलांचा गव्हाला फटका? शास्त्रज्ञांनी व्यक्त केली भीती
हवामानातील चढ-उताराचा फटका यावर्षी गव्हाच्या पिकाला (Wheat Crop) बसण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
wheat
1/9

हवामानातील चढ-उताराचा फटका यावर्षी गव्हाच्या पिकाला (Wheat Crop) बसण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
2/9

फेब्रुवारी महिन्यातील 'क्लायमेट फ्लक्चूएशन'मुळं गव्हाचं पीक कालावधीपुर्वीच पक्वं होण्याची परिस्थिती आहे. रब्बी हंगामात (Rabbi Season) जानेवारीत लागवड केलेल्या गव्हाला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केलीय.
3/9

गहू हे आपल्या देशातलं सर्वात महत्वाचं रब्बी पीक आहे. मात्र, यावर्षी मात्र, गव्हाच्या पिकाला मोठा फटका बसतोय.
4/9

आपल्या देशात साधारणत: दरवर्षी नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात गव्हाची पेरणी केली जातेय. तापमानातील चढ-उताराचा सर्वाधिक फटका हा जानेवारीत उशिरा पेरणी झालेल्या गव्हाला बसण्याची शक्यता आहे.
5/9

महाराष्ट्रात 13 लाख हेक्टर क्षेत्रावर गहू लागवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी हे क्षेत्र 9 लाख हेक्टर एव्हढं होते.
6/9

गव्हाच्या पेरणीनंतर यावर्षी पिकाला पोषक अशी थंडीही पडली नाही. त्यामुळं त्याचा थेट परिणाम पिकाच्या पक्वतेवर झाला आहे
7/9

जानेवारी महिन्याच्या मध्यापासून अनेक ठिकाणी ऊन आणि थंडीचा खेळ सुरू झाला आहे. दिवसा 35 अंशापर्यंत वाढलेला पारा आणि रात्री 10 ते 15 अंशांमुळं वाढलेला गारठा यामुळे पिकाच उत्पादन कमी होण्यासोबतच त्याचा दर्जाही कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे.
8/9

9/9

तापमानातील बदल हे भारतीय शेतीसमोरचं भविष्यातील फार मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळं कृषी विद्यापीठं आणि कृषी शास्त्रज्ञांसमोर या संकटावर उत्तर शोधण्याचं मोठं आव्हान आहे.
Published at : 24 Feb 2023 10:59 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement