एक्स्प्लोर
Photo : लम्पी आजारामुळं गुरांचे बाजार बंद, लाखो रुपयांची उलाढाल ठप्प

Cattle market closed
1/10

राज्यात लम्पी आजारामुळं गुरांचे बाजार बंद झाले आहेत. बाजार बंद झाल्यामुळं लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.
2/10

राज्यात लम्पी आजाराचा धोका वाढत आहे. त्यामुळं पशुपालक चिंतेत आहेत. तसेच लम्पीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जनावरांचं बाजर बंद ठेवण्यात आलं आहेत.
3/10

लम्पी आजारामुळं गुरांचे बाजार बंद. नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. जनावरांचे बाजार पुन्हा सुरु करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
4/10

नंदूरबार जिल्ह्यातल्या तळोदा अक्कलकुवा आणि नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात जनावरांचे बाजार भरत असतात. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते. मात्र, लम्पी प्रादुर्भावानंतर बाजार समितीमधील जनावरांचे बाजार बंद असल्यानं रब्बी हंगामासाठी बैल खरेदी करणाऱ्या तसेच ऊस तोडणीसाठी बैल जोडी खरेदी करणाऱ्या ऊस तोड कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
5/10

धुळे जिल्ह्यातही लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळं जनावरांचे बाजर बंद आहेत. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत 35 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे.
6/10

लम्पी स्कीन आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गेल्या दोन महिन्यांपासून धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत भरणारा गुरांचा आठवडे बाजार बंद करण्यात आला आहे.
7/10

लम्पी या संसर्गजन्य आजारामुळं गुरांच्या खरेदी विक्रीतून त्याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी बाजार बंद करण्यात आले आहेत. मात्र, यामुळं धुळे बाजार समितीत 35 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.
8/10

महाराष्ट्र राज्यातही लम्पी स्कीन आजाराचा धोका वाढला आहे. राज्यातील जवळपास 33 जिल्ह्यांमध्ये जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाली आहे.
9/10

लम्पी स्कीन आजारामुळं राज्यातील पशुपालक चिंतेत आहे. लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून, गुरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत.
10/10

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात जनावरांचे बाजार भरत असतात. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते. मात्र, लम्पी प्रादुर्भावानंतर बाजार समितीमधील जनावरांचे बाजार बंद करण्यात आला आहे.
Published at : 06 Nov 2022 11:28 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
विश्व
विश्व
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
