एक्स्प्लोर
Onion : महाराष्ट्रातील कांद्याला तेलंगणात चांगला दर
महाराष्ट्रातील कांद्याला तेलंगणामध्ये चांगला दर मिळत आहे. तेलंगणा सरकारच्या हमीभाव योजनेमुळे महाराष्ट्रातील कांद्याला चांगला दर मिळत आहे.
Onion
1/9

महाराष्ट्रातील कांद्याला तेलंगणात चांगला दर, हमीभाव कायद्यामुळं शेतकऱ्यांना फायदा
2/9

सध्या महाराष्ट्रातील (Maharashtra) कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण कांद्याच्या दरात (Onion Price) मोठी घसरण झाली आहे.
3/9

महाराष्ट्रातील कांद्याला तेलंगणामध्ये चांगला दर मिळत आहे. तेलंगणा सरकारच्या हमीभाव योजनेमुळे महाराष्ट्रातील कांद्याला तेलंगणात चांगला दर मिळत असल्याची प्रतिक्रिया तेलंगणाचे माजी आदीवासी मंत्री नागेश गोडाम ( Nagesh Godam) यांनी दिली.
4/9

तेलंगणा येथे महाराष्ट्रातील कांद्याला दुप्पट भाव दिला जात आहे.
5/9

जो कांदा भाव नसल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावर फेकण्याची वेळ महाराष्ट्रात आली, त्या कांद्याला तेलंगणा सरकार चांगला दर देत आहे.
6/9

तेलंगणा सरकारच्या हमीभाव कायद्यामुळं हा भाव देऊ शकले असेही नागेश गोडाम म्हणाले. गोडाम हे वर्धा इथं आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
7/9

कारंजा घाडगे येथे भारत राष्ट्र समितीकडून शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्यात आले.
8/9

तेलंगणा सरकारमध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. त्याच्या शेतमालाला भाव मिळण्यासाठी हमीभाव तर आहेच याशिवाय एक विशेष निधी देखील आहे.
9/9

कष्टाने पिकवलेला कांदा कवडीमोल भावात विकला गेल्यानं महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
Published at : 15 Jun 2023 12:07 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























